Tata Motors आणि Hyundai मध्ये जोरदार स्पर्धा, दुसऱ्या क्रमांकावरुन छेडलं आहे युद्ध; संपूर्ण बाजाराचं लक्ष
टाटा मोटर्सने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत टाटा मोटर्सने 53 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दरम्यान बाजारात Hyndai Exter दाखल झाल्यानंतर टाटा पंचसाठी आव्हान निर्माण झालं आहे.
जुलै महिन्यातील विक्रीचे अहवाल समोर आले आहेत. जुलै महिना सर्वच वाहन निर्माता कंपन्यांसाठी संमिश्र राहिला. मात्र यावेळी टाटा मोटर्स आणि साऊथ कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai यांच्यात जोरदार स्पर्धा रंगल्याचं दिसत आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी तगडी स्पर्धा सुरु आहे. दोन्ही कंपन्यांच्या कार सेल्स रिपोर्टमध्ये फार कमी अंतर आहे. टाटा मोटर्सच्या पंचने बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली असताना दुसरीकडे हुंडाईने बाजारात Exter उतरवत चांगलंच आव्हान दिलं आहे. जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सेल्स रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे.
हुंडाईकडून 50 हजार 701 युनिट्सची विक्री
हुंडाईने प्रेस रिलीजमधून दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जुलै महिन्यात घरगुती बाजारपेठेत 50 हजाराहून अधिक गाड्यांची विक्री केली. यावेळी SUV गाड्यांनी कंपनीचा सेल्स चांगला होण्यात हातभार दिला. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या स्वस्त SUV Exter ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय क्रेटा. वेन्यू आणि अल्कजारसारख्या गाड्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
THAR ते Scorpio-N, दमदार कारसह महिंद्रा सज्ज; 15 ऑगस्ट ठरणार गेम चेंजर
हुंडाईने जुलै महिन्यात 66 हजार 702 युनिट्सची विक्री केली आहे. ज्यामध्ये घरगुती बाजारपेठेत विकण्यात आलेल्या 50 हजार 701 युनिट्स आणि एक्स्पोर्ट करण्यात आलेल्या 16 हजार युनिट्सचा समावेश आहे. तसंच जुलै-2023 मध्ये कंपनीचा एक्स्पोर्टही 19 टक्क्यांनी वाढलं आहे. गतवर्षी जुलै महिन्यात 13 हजार 351 गाड्या एक्स्पोर्ट झाल्या होत्या.
Tata Motors च्या 47 हजार 689 युनिट्सची विक्री
टाटा मोटर्सची विक्री मागील जुलै महिन्याच्या तुलनेत कमी झाली आहे. पण यानंतर कंपनीच्या एकूण 80 हजाराहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. सर्वाधिक वाहन विक्री करणारी देशातील ही तिसरी कंपनी आहे. टाटा मोटर्सची पंच, नेक्सॉन, टिगोर आणि टिएगो सारख्या गाड्या चांगली कामगिरी करत आहेत. पण आता हुंडईची 6 लाखांची Exter एसयुव्ही बाजारपेठेत आल्यानंतर टाटा पंचसमोर आव्हान निर्माण झालं आहे.
दरम्यान, विक्रीची आकडेवारी पाहिल्यास टाटा मोटर्सने जुलै 2023 मध्ये 80 हजार 633 युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये 47 हजार 689 युनिट्स प्रवासी गाड्या आणि 32 हजार 944 युनिट्स व्यावसायिक वाहनं आहेत.
दरम्यान कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांनीही जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटा मोटर्सच्या एकूण 6 हजार 329 इलेक्र्टिक वाहनांची विक्री झाली आहे. मागील जुलै महिन्यातील 4151 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ तब्बल 5 टक्के आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओत नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि टिएगो ईव्ही आहे.