Mahindra Thar, Scorpio-N : यंदाच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सर्वांसाठीच अधिकाधिक खास असणार आहे. एकिकडे या दिवशी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच दुसरीकडे कारप्रेमींसाठी परवणी ठरणार आहे. कारण, देशातील अग्रगणी कार उत्पाकद कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Mahindra and Mahindra कडून या दिवसासाठीची खास तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. जिथं ग्लोबल इवेंट (Mahindra Futurescape) अर्थात जागतिक स्तरावरील एका कार्यक्रमामध्ये कंपनीकडून दोन दमदार कार्स लाँच केल्या जाणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिंद्राच्या ग्लोबल इवेंट फ्यूचरएस्केप (Mahindra Futurescape) मध्ये कंपनीकडून काही नव्या संकल्पना कारप्रेमींसमोर आणल्या जाणार आहेत. जिथं इलेक्ट्रीक थार आणि नव्या रुपातील स्कॉर्पिओच्या पिक अप ट्रकचा (Scorpio Pick-Up) लूक सर्वांसमोर येणार आहे. शिवाय याच वेळी थारच्या पाच दरवाजे असणाऱ्या व्हेरिएंटही इथं सादर केलं जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार महिंद्राच्या विश्वस्तरिय कार्यक्रमामध्ये थारच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटला सादर केलं जाईल. फोर व्हील ड्राईव्र आणि (4X4) सेटअप असणाऱ्या या कारमध्ये क्वॉड मोटारचा वापर केला जाऊ शकतो. अर्थात याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. आता यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नेमकी कितपत इलेक्ट्रीक आहे आणि पेट्रोलचा सपोर्ट कसा वापरला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थार इलेक्ट्रिकशिवाय आणखी एक गेम चेंजर महिंद्राला नव्या रुपात सादर करणार आहे. कारण, या कार्यक्रमात स्कॉर्पियो-एनच्या पिकअप वर्जनलाही सादर केलं जाणार आहे. इथं खास बाब म्हणजे ही कार दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्यांना केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आलं आहे. याचा टीझरही प्रदर्शित केला गेला आहे. हा टीझर पाहता हे पिकअप मॉडेल कंपनीचं ग्लोबल मॉडेल असेल. सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार Z121 हे या कारचं टोपणनाव आहे. नेहमीच्या स्कॉर्पिओ कारच्या तुलनेत यामध्ये अनेक बदल असतील. तेव्हा आता ही कार नेमकी किती किमतीला विकली जाते आणि तिला कारप्रेमींचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Get ready to go global.
Experience freedom. Break boundaries. Our new Global Pik Up vision is ready to be unleashed. #Futurescape #GoGlobal
Cape Town, South Africa
15th August, 2023 pic.twitter.com/5BEDzDU9D2— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) July 29, 2023
तुम्हीही या कारच्या संकल्पनांविषयी उत्सुक असाल तर, एक बाब लक्षात घ्या की थारचं इलेक्ट्रीक मॉडेल हे एक कन्सेप्ट मॉडेल असेल. त्यामुळं त्याच्या प्रोडक्शन रेडी मॉडेलपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ दवडला जाऊ शकतो.