Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. नववर्ष 2023 मध्ये, टाटा नेक्सन आणि पंच एसयूव्हीचं सीएनजी वर्जन लाँच करू शकते. याशिवाय, प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझची सीएनजी वर्जनदेखील येऊ शकते. दुसरीकडे, मारुती ब्रेझाच्या सीएनजी वर्जनची चाचणी करत असून पुढील वर्षी लाँच करू शकते. मारुती ब्रेझाची सीएनजी लवकरच बाजारात दाखल होणार आहे. हे ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच केले जाऊ शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये सध्याच्या 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसोबत CNG किट दिले जाऊ शकते.
या गाड्यांच्या सीएनजी लाँचबद्दल टाटा मोटर्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण नेक्सॉन सीएनजीची चाचणी सुरु असल्याचं पाहिलं गेलं आहे. Nexon CNG 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असू शकते. तसेच फॅक्टरी-फिट केलेल्या CNG किटसह देऊ शकते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे. पेट्रोलवर हे इंजिन 120bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर पॉवर आउटपुट 10-15bhp ने कमी होण्याची शक्यता आहे. टाटा नेक्सन पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या तीन आवृत्त्यांमध्ये येते. ऑक्टोबरमध्ये ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे.
बातमी वाचा- रोड टॅक्सचं नो टेन्शन! Hyundai Creta फक्त 7.5 लाख रुपयात, कसं ते जाणून घ्या
दुसरीकडे, पंच सीएनजीमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सीएनजी किट दिले जाऊ शकते. सीएनजीवरही त्याचे पॉवर आउटपुट कमी होईल. हे केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह देखील असू शकते. रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी ही गाडी बाजारात आणले जाऊ शकते.