Tata आणणार सगळ्यांच्या नाकात दम; NEXON चं जबरदस्त Facelift मॉडेल अखेर लाँच; किंमत खिशाला परवडणारी
Tata NEXON ने भारतीय बाजारपेठेत आपलं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने कारमध्ये अनेक बदल केले आहेत, जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कारला अजून दमदार बनवत आहेत.
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही टाटा नेक्सॉनच्या (Tata NEXON) फेसलिफ्ट मॉडेलला विक्रीसाठी लाँच केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह उपलब्ध असणाऱ्या या एसयुव्हीसाठी सुरुवातीची किंमत 8 लाख 10 हजार ठेवण्यात आली आहे. टाटा मोटर्सने एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच केली आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या एसयुव्हीचा लूक आणि डिझाइन फार वेगळं आहे. याशिवाय कंपनीने अनेक भन्नाट फिचर्स दिले आहेत.
कशी आहे नवी टाटा नेक्सॉन?
नेक्सॉनच्या फेसलिफ्ट मॉडेलच्या एक्स्टिरियरपासून ते इंटिरिअरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. याच्यात स्लिप्ट-हेडलँप सेटअप देण्यात आला आहे. हेडलाइट्सच्या खालील भागात एका मोठ्या ग्रीलसह एक ट्रेपोजॉइडल हाऊससिंग ठेवण्यात आलं आहे. ज्याच्या आरपार एक मोठी प्लास्टिक पट्टी लावण्यात आली आहे. यामध्ये एलईडी-डे टाइम रनिंग लाइटही देण्यात आली आहे.
पण या एसयुव्हीमधील साइड प्रोफाइल बराचसा आधीसारखाच आहे. पण याच्यात नवे एक्सेंट लाइन देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये एक नव्या डिझाईचना अलॉय व्हील देण्यात आला आहे, जो एसयुव्हीला फ्रेश लूक देतो. मागील भागात नवे अपडेटेड फुल-एलईडी टेल लाइट्ससह टाटाचा लोगो देण्यात आला आहे.
याशिवाय रिव्हर्स लाइटला टेल-लाइट हाऊजिंग सेक्शनमधून हटवत बंपर लावण्यात आला आहे. फॉक्स स्किड प्लेट असणाऱ्या या एसयुव्हीचा ग्राऊंड क्लिअरन्स 208 मिमी आहे. आधीच्या मॉडेलमध्येही इतकाच ग्राऊंड क्लिअरन्स होता.
टाटा नेक्सॉनचं केबिन आणि इंटिरियर
टाटा नेक्सॉनच्या केबिनला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की, यामध्ये नव्या टचस्क्रीन सेटअप आणि टू-स्पोक स्टिअरिंग व्हीलसह कर्व्ह कन्सेप्टच्या इंटिरिअरपासून प्रेरित डिझाइन देण्यात आलं आहे. यामध्ये एसी वेंट्सला आधीपेक्षा थोडं अजून छोटं करण्यात आलं आहे. यामुळे डॅशबोर्डवर कमी बटण पाहण्यास मिळतात, जे फिचर्स हाताळणं सोपं करतात.
डॅशबोर्डच्या कार्बन-फायबरसारख्या फिनिशसह लेदर इन्सर्ट मिळतो. यामध्ये फ्री-स्टँडिंग 10.25 टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टीम देण्यात आलं आहे. अन् दुसरीकडे स्क्रीन म्हणून 10.25 इंचाचं फूल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळतो. ज्याला नॅव्हिगेशनसाठी कस्टमाइज करु शकतो.
पॉवर आणि परफॉर्मन्स
कंपनीने नव्या नेक्सॉनच्या इंजिन मेकॅनिझममध्ये काही बदल केलेले नाहीत. हे इंजिन आधीप्रमाणेच 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसह येतं. याचं टर्बो इंजिन चार वेगवेगळ्या गेअरबॉक्सचा पर्याय देतं. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्यूअल, 6-स्पीड मॅन्यूअल, 6-स्पीड एएमटी आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्स आहे.
टॉप-स्पेक नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये समाविष्ट असलेल्या काही इतर फिचर्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर यांचा समाविष्ट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज, ESC, सर्व आसनांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX तसेच इमर्जन्सी आणि ब्रेकडाउन कॉल असिस्टंट सुविधा देण्यात आली आहे.