Tata Punch CNG Launch: भारतामध्ये मागील काही वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास जीवनशैलीमध्ये झालेला सकारात्मक बदल, अनेकांची अर्थार्जनाची क्षमता आणि एकंदर आर्थिक विकास पाहिला तर हा आलेख संतुलित दिसत आहे. आलिशान जीवनशैलीकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. यात अनेक कुटुंबांकडे असणाऱ्या खासगी वाहनांचा आकडाही वाढतोय हे नाकारता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:ही हक्काची कार हवी असं बऱ्याचजणांना वाटतं. कधीएकेकाळी Luxury म्हणून ज्या कारकडे पाहिलं जात होतं तिच कार आज Must आहे असं म्हणज खरेदी करण्याला मोठा वर्ग प्राधान्य देताना दिसतो. तुम्हीही पहिलीवहिली कार खरेदी करण्याचा बेत आखताय का? असं करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. 


टाटा मोटर्सचं खास सरप्राईज... 


TATA Motors कडून अधिकृतपणे ड्युअल सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान असणारी बहुप्रतिक्षित मायक्रो एसयुव्ही टाटा पंच सीएनजी लाँच करण्यात आली आहे. प्योर, अॅडवेंचर, रिदम आणि अकम्प्लिश्ड असे चार व्हेरिएंट कंपनीकडून सादर करण्यात आले आहेत. 


कारची किंमत क्रमश: 7.10 लाख रुपये, 7.85 लाख रुपये, 8.20 लाख रुपये आणि 8.85 लाख रुपयांच्या घरात आहे. इथं कमाल गोष्ट म्हणजे या दरश्रेणीमध्ये कारला टक्कर देतेय अनेकांची पसंती असणारी  Hyundai Exter CNG. या कारच्या एस व्हेरिएंटची किंमत आहे 8.24 लाख रुपये. तर, SX व्हेरिएंटची किंमत आहे 8.97 लाख रुपये. 


हेसुद्धा वाचा : हे पहिल्यांदाच...! महासागरातील पाणीही तापलं; जगभरात सूर्य आग ओकतोय, का आली ही वेळ? 


दमदार फिचर्स... 


टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जनसारख्याच दिसणाऱ्या सीएनजी मॉडलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारमध्ये 7.0 इंचांचा हरमन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे. शिवाय किलेस एंट्री, ड्रायव्हर सीट हाईट अॅडजस्टमेंट, सनरुफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो एसी, फॉग लँप आणि 15 इंच व्हील्स अशा सुविधा मिळतातं. 


कारच्या इंजिनविषयी सांगावं तर, यामध्ये तुम्हाला 1.2 लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जिथं हे इंजिन 113Nm टॉर्क आणि 86bhp पॉवर जनरेट करतं. CNG वर हेच इंजिन 103Nm टॉर्क आणि 73.4bhp पॉवर जनरेट करतं. आहेत की नाही कमाल फिचर्स? मग कधी खरेदी करताय ही कार?