देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आज घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एयसुव्ही सफारीच्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं आहे. कंपनीने या एसयुव्हीत अनेक बदल केले आहेत, जे मागील मॉडेलच्या तुलनेत तिला अधिक दमदार बनवत आहेत. आकर्षक लूक आणि दमदार फिचर्स असणाऱ्या टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16 लाख 19 हजार रुपये ठरवण्यात आली आहे. या एसयुव्हीच्या टॉप मॉडेलसाठी 25 लाख 49 हजार (एक्स-शोरुम) मोजावे लागणार आहेत. या कारच्या फिचर्सबद्दल जाणून घ्या. 


कशी आहे नवी टाटा सफारी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा सफारीने नव्या मॉडेलमध्ये अनेक बदल करत सादर केलं आहे. या एसयुव्हीमध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्स देण्यात आले आहेत. यामुळे या एसयुव्हीचा मायलेज वाढला आहे. कंपनीने यामध्ये 2 लीटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला आहे, जे 170PS ची पॉवर आणि 350Nm चा टॉर्क जनरेट करतं. ऑटोमॅटिक गेअरबॉक्स फक्त अॅडव्हेंचर+व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट असे तीन टेरेने रिस्पॉन्स मोड आणि इको, सिटी, स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतात. 


मायलेज किती? 


नवी टाटा सफारी चार मुख्य ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि अकम्प्लिश्ड यांचा समावेश आहे. टाटा सफारी मॅन्यूअल व्हेरियंटमध्ये 16.30 किमी/लीटर आणि ऑटो व्हेरियंटमध्ये 14.50 किमी/लीटरपर्यंत मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे 


इंटिरिअर आणि फिचर्स


टाटा सफारीच्या इंटिरिअरमध्ये 12.3 इंत मोठी इंफोटेनमेंट सिस्टम आणि नॅव्हिगेशनसह एका नव्या डिजिटल इंस्ट्रूमेंटसह डिझाइन करण्यात आलेल्या डॅशबोर्ड मिळतो. स्टेअरिंग व्हिलचं डिझाइन बदलण्यात आलं आहे. कारमध्ये आता बॅकलिट लोहोसह 4-स्पोक अलॉय व्हिल मिळते. 


याशिवाय एचव्हीएससी कंट्रोलसाठी एक टच बेस्ड पॅनेल, 10.25 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी एक नवाय ड्राइव्ह सेलेक्टर आणि रोटरी नॉब यांचा समावेश आहे. यामध्ये डिजिटल डिस्प्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पहिल्या आणि दुसऱ्या रांगेसाठी व्हेंटिलेटेड सीट, 10 स्पीकर जीबीएल ट्यून साऊंड सिस्टम, रेअर विंडो शेड्स यांचा समावेश आहे. 


सेफ्टी फिचर्स


नवी टाटा सफारी सुरक्षेतही तडजोड करत नाही. कंपनीचा दावा आहे की, NCAP क्रॅश टेस्टमध्ये नव्या सफारी 34 पैकी 33.05 पॉइंट्स मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. एकूण नवी टाटा सफारी 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. 


सेफ्टी फिचर्ससाठी या एसयुव्हीत 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरफिक सनरुफ, पॅडल शिफ्टर्स, एम्बिएंट लायटिंग, इलेक्ट्रिक पावर्ड टेलगेट आणि 6 एअरबॅग मिळतात. टॉप व्हेरियंटमध्ये 7 एअरबॅग मिळतात. कंपनीने यामध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम दिली आहे, जी सुरक्षेला अधिक चांगली बनवते.