सनरुफ, भन्नाट डिझाइन अन्.... Tata Sumo 2025 पुढे 35 लाखांची फॉर्च्युनरही फिकी! किंमत फक्त...
Tata Sumo 2025 Know Price: 1994 साली पहिल्यांदा बाजारात दाखल झालेल्या या प्रसिद्ध गाडीचं नवीन व्हर्जन हे फारच आधुनिक आणि दमदार आहे.
Tata Sumo 2025 Know Price: 1994 साली बाजारामध्ये दाखल झालेली टाटा कंपनीची सुमो पाहता पाहता भारतीयांच्या मनात भरली आणि भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी कार्सपैकी एक ठरली. मोठ्या कुटुंबाबरोबरच पर्यटनासाठी प्रामुख्याने वापरण्यात आलेल्या या कारचं नवीन मॉडेल म्हणजेच टाटा सुमो 2025 चा फर्स्ट लूक समोर आला आहे. 30 ते 35 लाखां रेंजमध्ये असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरला टाटांची ही नवीन सुमो गाडी थेट टक्कर देईल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे मूळ टाटा सुमोपेक्षा अधिक आकर्षक आणि नवीन फिचर्ससहीत आलेली ही कार सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. या कारची संभाव्य किंमतही समोर आली आहे. या कारचे फिचर्स जाणून घेऊयात...
प्रिमिअर लूक्स
टाटा मोटर्सने सुमोच्या 2025 च्या व्हर्जनच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर एलईडी हेडलाइट्स, टेललाइट्स, आणि कनेक्टेड फॉग लॅम्प्स कारमध्ये देण्यात आळे आहेत. सुमो 2025 मध्ये 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि रूफ रेल्स देण्यात आल्याने कारला एक स्टायलिश लूक मिळतोय. कारच्या रियरमध्ये शार्क-फिन अँटेना आणि स्पॉयलरसह सुधारित डिझाईन दिले गेले आहे.
जबरदस्त इंटिरिअर
प्रशस्त केबिन, प्रीमियम लेदर सीट्स, आणि 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम कारमध्ये आहे. कारमधील इन्फोटेनमेंट सिस्टीम 'अॅपल कारप्ले' आणि 'आँड्रॉइट ऑटो' सिस्टीमला सपोर्ट करणारा आहे. पॅनोरॅमिक सनरूफबरोबरच मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, आणि वाय-फाय चार्जिंग यासारख्या लक्झरी सुविधाही या परवडणाऱ्या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.
सुरक्षित कार
नवीन सुमो 2025 मध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), आणि एडीएएस तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. सुसज्ज आहे. एडीएएसमध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग यासारखी आधुनिक वैशिष्ट्यांचाही समावेश आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
नवीन सुमोमध्ये बीएस सिक्स मानक असलेलं 2.0 लीटर डिझेल इंजिन, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, आणि हायब्रिड इंजिन असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. 4x4 प्रणाली आणि लो-रेंज गेअरबॉक्समुळे ही गाडी ऑफ-रोडिंगसाठीही फारच उत्तम आहे.
आधुनिक फिचर्स
सुमो 2025 मध्ये वॉइस कमांड, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, आणि ओवर-द-एअर (OTA) अपडेट्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
किंमत
नवीन टाटा सुमोची सुरुवातीची किंमत अगदी 9 लाखांपासून सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मीड रेंज व्हेरिएंट हे 12 लाखांपासून उपलब्ध करुन दिलं जाऊ शकतं. तर या नव्या टाटा सुमोचं टॉप मॉडेल्स 22 लाखांपर्यंत जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत या कारची घोषणा कंपनीकडून केली जाईल असं सांगितलं जात आहे.