Tata Tiago EV: देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors), महिंद्रा (Mahindra), एमजी मोटर्स (MG Motors) आणि हुंडई (Hyundai) सहित अनेक ब्रँड्सने बाजारात आपल्या इलेक्ट्रिक चारचाकी आणल्या आहेत. दरम्यान, सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक चारचाकींच्या विक्रीचा आकडा पाहिला तर टाटा मोटर्सचा दबदबा असल्याचं दिसत आहे. टाटा कंपनीने फक्त चार महिन्यात आपली स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक कार Tata Tiago EV च्या 10 हजार युनिट्सची डिलिव्हरी केल्याचा दावा केला आहे. यासह Tata Tiago EV सर्वात वेगाने डिलिव्हर होणारी देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी Tata Tiago EV ने फक्त 24 तासात 10 हजार बुकिंग आणि डिसेंबर 2022 पर्यंत 20 हजार बुकिंग मिळवत सर्वात वेगाने बूक होणारी इलेक्ट्रिक कार होण्याचा मान मिळवला होता. टाटा मोटर्सने सांगितलं आहे की, Tata Tiago EV ने यशस्वीपणे 491 शहरांचा प्रवास केला आहे. 11.2 मिलियन किमीच्या या प्रवासात कोणत्याही ICE इंजिन कारच्या तुलनेत या कारने पर्यावरणात 1.6 मिलियन ग्राम CO2 उत्सर्जन रोखलं आहे. 


Tiago EV ने लाँच झाल्यापासूनच अनेक नवे रेकॉर्ड स्थापिक केले आहे. भारतातील सर्वात वेगाने बुक होणारी ईव्ही ते 10 हजार डिलिव्हरीचा टप्पा गाठणारी भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार होईपर्यंत या कारने कोणतीच गोष्ट मागे सोडलेली नाही असं टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे हेड विवेक श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. 


Tiago EV दोन बॅटरी पॅकच्या पर्यायात उपलब्ध आहे. यामधील एकात 19.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो तर दुसऱ्यात 24kWh क्षमतेची बॅटरी मिळते. यामध्ये अनुक्रम 250 किमी आणि 315 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते. या कारच्या कमी रेंजच्या मॉडेलची इलेक्ट्रिक मोटर 60bhp ची पॉवर देते आणि 105Nm चा टॉर्क जनरेट करते. तर हायर रेंजमध्ये 74bhp ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करते. 


Tiago EV टाटा मोटर्सच्या Ziptron हाय-व्होल्टज इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर वर आधारित असून 50kW DC फास्ट चार्जिंगसा सपोर्ट करते. 50kW DC फास्ट चार्जरसह Tiago EV ची बॅटरी 57 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्जिंग करु शकते. या कारला दोन ऑनबोर्ड चार्जिंग सुविधेसह सादर करण्यात आलं आहे. यामधील 19.2kWh बॅटरी व्हर्जनमध्ये 3.3kW चा चार्जर देण्यात आला आहे. तर मोठ्या पॅकमध्ये 7.2kW चा फास्ट चार्जिंगचा पर्याय मिळतो. यामध्ये बॅटरी 3.5 तासात फूल चार्ज होते.