Tata Tiago, Tigor iCNG: भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा चारचाकी वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचं दिसत आहे. यामुळे कारनिर्माता कंपन्यांना अच्छे दिन आले आहेत. दरम्यान, कारनिर्माता कंपन्यांमध्ये चांगली स्पर्धा सुरु असून सीएनजी व्हेरियंटही बाजारात आणत आहेत. त्यातच आता टाटा मोटर्सने आपल्या टियागो आणि टिगोर मॉडेलच्या iCNG व्हर्जनला अपडेट करत बाजारात लाँच केलं आहे. या कारला ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानाने अपडेट करण्यात आलं आहे. या कारमध्ये नेमके काय फिचर्स आहेत? तसंच किंमत किती आहे? हे जाणून घ्या... 


या कारची किंमत किती ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्याने लाँच केलेल्या टाटा टियागो iCNG (2023 Tata Tiago iCNG) ची किंमत 6 लाख 55 हजार रुपयांपासून (Ex Showroom) सुरु होत आहे. तर टाटा टिगोर CNG (Tata Tigor iCNG) ची किंमत 7 लाख 80 हजार (Ex Showroom) ठेवण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही कारच्या अपडेटेड मॉडेलच्या सर्व व्हेरियंटची किंमत किती असणार आहे हे जाणून घ्या...


Tata Tiago iCNG: व्हेरियंटच्या आधारे किंमत


 


टाटा टियागो iCNG किंमत (एक्स-शोरूम)


 


XE CNG 6.55 लाख रुपये


XM CNG 6.90 लाख रुपये


XT CNG 7.35 लाख रुपये


XZ+ CNG 8.10 लाख रुपये


XZ+ DT CNG 8.20 लाख रुपये


XT NRG CNG 7.65 लाख रुपये


XZ NRG CNG 8.10 लाख रुपये


नव्याने अपडेट करण्यात आलेल्या टियागो iCNG ची किंमत 6 लाख 55 हजार ते 8 लाख 10 हजारांपर्यंत आहे. भारतीय बाजारात कंपनीने आपल्या पंच मॉडेलचंही CNG व्हर्जन आणलं आहे. याच आधारे टाटा मोटर्सने आपल्या टियागो आणि टिगोर मॉडेलमध्येही ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे कंपनीचा सीएनजी पोर्टफोलिओ अधिक मजबूत आणि आकर्षक झाला आहे असं टाटा मोटर्स प्रवासी वाहन लिमिटेडचे मार्केटिंग हेड विनय पंत यांनी सांगितलं आहे. 


Tata Tigor iCNG: व्हेरियंटच्या आधारे किंमत


 


टाटा टिगोर iCNG किंमत (एक्स-शोरूम)


XM CNG 7.80 लाख रुपये


XZ CNG 8.20 लाख रुपये


XZ+ CNG 8.85 लाख रुपये


XZ+ LP CNG 8.95 लाख रुपये


 


नव्याने अपडेट करण्यात आलेल्या टिगोर iCNG ची किंमत 7 लाख 8 हजारांपासून ते 8 लाख 95 हजारांपर्यंत ठेवण्यात आली आहे. अपडेटेड Tata Tiago iCNG व्हेरियंटची किंमत 6 लाख 55 हजारांपासून ते 8 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे, तर Tigor iCNG ची किंमत 7 लाख 80 हजार ते 8 लाख 95 हजार रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूममधील आहेत. विशेष म्हणजे, टाटा टियागो आणि टिगोर या त्‍यांच्‍या प्रकारातील एकमेव कार आहेत ज्या पेट्रोल, बाय फ्लूएल सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्‍ये उपलब्‍ध आहेत.


 


Tata Tiago, Tigor iCNG: इंजिन आणि गेअरबॉक्स


Tata Tiago आणि Tigor च्या iCNG ला समान 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, बाय फ्लूएल पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन 84 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 72 बीएचपी पॉवर आणि 95  एनएम टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, दोन्ही कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दरम्यान कंपनीने या कार किती मायलेज देतात याचा खुलासा केलेला नाही. 


दरम्यान टाटा मोटर्सने टियागो आणि टिगोर मॉडेलच्या अपडेटेड सीएनजी कारमध्ये 70 लीटर क्षमतेचे दोन सिलेंडर अत्यंत हुशारीने फिट करण्यात आले आहेत. यामुळे सामान ठेवण्यासाठी या कारमध्ये अतिरिक्त बूट स्पेस मिळत आहे.