काय आहे Tatkal Passport Service; कसा कराल अर्ज, इथं जाणून घ्या संपूर्ण पद्धत
Tatkal Passport Service : भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवांमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रतीक्षा करण्याची किचकट प्रक्रिया सुलभ केली तर? , ही संपूर्ण पद्धत पाहा.
मुंबई : Tatkal Passport Service : काही वेळ अशी येते की, आपल्याला पासपोर्टची गरज भासते. मात्र, तो आपल्याकडे नसल्याने परदेशवारीला मुकतो. जर अचानक परदेश दौऱ्यावर जाण्याचे वेळ येते अशावेळी तात्काळ पासपोर्ट काढण्याची गजर भासते. मात्र, असा पासपोर्ट काढण्याबाबत आपल्याला माहिती नसते. अशावेळी Tatkal Passportसाठी कसा करायचा, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण पद्धत पाहा.
परराष्ट्र मंत्रालयाने (EAM) पासपोर्ट अर्जांना तात्काळ मंजुरी देण्याची तरतूद केली आहे. हे Tatkal Passport Serviceअंतर्गत करण्यात आले आहे. ज्यांना तातडीने दुसऱ्या देशात विमान प्रवास करण्याची गरज आहे त्यांना यामुळे मदत होईल. भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवांमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रतीक्षा करण्याची किचकट प्रक्रिया सुलभ केली तर?
अलीकडे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (EAM) पासपोर्ट अर्जांना तात्काळ मंजुरी देण्याची तरतूद केली आहे. हे तत्काळ योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. हे अशा लोकांना मदत करेल. ज्यांना तातडीने प्रवास करण्याची आवश्यकता आहे आणि कमी वेळेत त्यांचा पासपोर्ट मिळू शकेल.
तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
पेमेंट प्रक्रिया :
नागरिक ऑनलाइन तत्काळ पासपोर्ट सेवेसाठी नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि SBI बँक चलनाद्वारे ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे त्यांचे पेमेंट करू शकतात.
तत्काळ पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे:
तत्काळ पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे. यामध्ये, पडताळणी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, शस्त्र परवाना, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, गॅस कनेक्शन बिल, बँक पासबुक, SC/ST/OBC प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सेवा फोटो ओळख, विद्यार्थी ओळखपत्र, परिशिष्ट F नुसार, समाविष्ट आहे. मालमत्तेची कागदपत्रे, पेन्शन दस्तऐवज, पॅन कार्ड, रेल्वे आयडी, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र (असल्यास). यापैकी कोणतेही तीन नमूद कागदपत्रे तत्काळ पासपोर्ट सेवेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सबमिट केली जाऊ शकतात.
तत्काळ पासपोर्ट सेवेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम टप्पा
स्टेप 1- पासपोर्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://passportindia.gov.in.
स्टेप - 2 पासपोर्ट सेवांच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणीवर क्लिक करा.
स्टेप - 3 तुमचा आयडी आणि पासवर्डसह पोर्टलवर लॉग इन करुन पुढे जा.
स्टेप - 4 स्क्रीनवर 'फ्रेश' आणि 'री-इश्यू' असे दोन पर्याय दिसतील, सूचीमधून लागू पर्याय निवडा.
स्टेप - 5 पुढे, दिलेल्या प्लान प्रकारातील योजनांच्या अंतर्गत 'तत्काळ' पर्यायावर क्लिक करा.
स्टेप - 6 आता, अर्ज डाउनलोड करा आणि सर्व तपशील भरा.
स्टेप - 7 फॉर्म सबमिट करण्यासाठी पुढे जा.
स्टेप - 8 आता, पेमेंट प्रक्रिया समाप्त करा.
स्टेप - 9 ऑनलाइन पेमेंटच्या पावतीची प्रिंट घेऊन पुढे जा.
स्टेप - 10 पुढील प्रक्रियेसाठी तुमच्या क्षेत्रातील जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) तुमची अपॉइंटमेंट बुक करा.