मुंबई : सध्याच्या डिजीटल (Digital) युगात इंटरनेटचं (Internet) महत्त्व श्वासाप्रमाणे झालंय. काही मिनिटांसाठी इंटरनेट बंद असलं की जीव वर खाली होतो. इंटरनेट स्लो (Slow Internet) चालत असेल तर अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. कधीकधी तर नेमकं कामाच्यावेळेसच इंटरनेट स्लो चालतं. अशावेळेस मनस्ताप होतोच. तुमच्यासोबत असं होऊ नये यासाठी आम्ही एका डिव्हाइसबाबत सांगणार आहोत, जो इंटरनेटचा स्पीड चौपटीने (Internet Boosting) वाढवू शकतो. (tech news wifi extender incresed internet speed know how to use and price)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेट चौपटीने वाढवणाऱ्या या जादूई डिव्हाइसचं नाव आहे (Wifi Extender) वायफाय एक्सटेंडर. आकाराने छोटा असला तरी हा डिव्हाइस झटक्यात इंटरनेट बूस्ट करतो. यामुळे इंटरनेटची स्पीड वाढण्यास मदत होते. जर तुमच्या घरात एका रुममधून दुसऱ्या रुममध्ये नीट वायफाय सिग्नल येत नसेल, तर हे डिव्हाईस तुमची डोकेदुखी थांबवेल. 


किंमत किती?


या डिव्हाइसची किंमत ऑनलाईल वेबसाईटवर 2 हजार ते  अडीच हजारापर्यंत आहे. तसेच आकारानेही हे डिव्हाइस लहान आहे. त्यामुळे हे डिव्हाइस कुठेही एडजस्ट करता येतं. 


डिव्हाइस कसं वापरायचं?


वायफायजवळ कोणत्याही पावर कोर्टमध्ये या एक्सटेंडर डिव्हाइसला प्लग इन करा आणि ऑन करा. यानंतर आपोआप वायफायचा वेग वाढायला लागेल, ज्यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यात सुपरफास्ट इंटरनेट मिळेल.