Technology News : तुम्ही आम्ही घरात, ऑफिसात, ट्रेनमध्ये, सार्वजनिक ठिकाणी अगदी जेवण करता करताही मोबाईलचा (Mobile Phone) वापर करत असता. काही जण तर टॉयलेटमध्येही (Toilet) मोबाईल वापरतात. मोबाईल हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग बनलाय. पण तुम्हाला कल्पनाही नसेल हाच मोबाईल आरोग्यासाठी अतिशय घातकही ठरू शकतो. कारण आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनवर (Smartphone) एक दोन नव्हे तर तब्बल 17 हजार बॅक्टेरिया आढळून आलेत. याचाच अर्थ मोबाईल टॉयलेटपेक्षाही जास्त घाण आहे. अॅरिजोना युनिव्हर्सिटीच्या (The University of Arizona) शास्त्रज्ञांनी मोबाईलबाबत हा धक्कादायक अहवाल दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालानुसार युझर्स (Users) मोबाईल कुठेही ठेवतात. त्यामुळे कळत नकळत स्मार्टफोनच्या स्क्रीनवर शेकडो बॅक्टेरिया (Bacteria) चिकटलेले असतात. या बॅक्टेरियांचं प्रमाण 17 हजारांपर्यंत असू शकतं. त्यामुळे सामान्य टॉयलेटच्या तुलनेत हा मोबाईल 10 पटीनं जास्त घाण असू शकतो. हाच मोबाईल चेहऱ्याजवळ, तोंडाजवळ नेल्यास आजारांना निमंत्रण मिळू शकतं. 



मोबाईल आपल्यासाठी गरजेचा असल्यानं त्याचा वापर टाळणं अशक्य आहे. मात्र मोबाईलचा वापर करताना काळजी घेतल्यास आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. 


मोबाईलचा नियमित वापर करताना तो स्वच्छ करून घ्या. मोबाईल पाण्याखाली धुवू नका. मोबाईल सॅनेटाईज करण्यासाठी बाजारात अनेक साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा.  एकूणच काय तर मोबाईल वापरताना काळजी घ्या. अन्यथा तुमच्यावर हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येईल.