Samsung कि Apple, कोण आहे Smartphones चा बादशाह? आकडेवारी आली समोर
Technology : गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल कंपनीने बाजी मारली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
Technology Samsung vs Apple : सध्याच्या युगात स्मार्टफोन हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाईन शॉपिंगपासून बँकिंगच्या कामापर्यंत जवळपास सर्वच गोष्टी आता मोबाईलच्या एका क्लिकवर होऊ लागली आहेत. गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून मोबाईल बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी बाजारात आपले स्मार्टफोन आणले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल कंपनीने बाजी मारली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
कोण आहे स्मार्टफोनचा बादशाह?
रिचर्स करणाऱ्या 'International Data Corporation' (IDC) ने आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार स्मार्टफोन विक्रीच्या क्रमवारीत सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung Electronics) ही कंपनी अव्वल स्थानावर पोहोचली आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर अॅप्पल (Apple) कंपनी होती. आता अॅप्पल दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. याशिवाय चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोननेही बाजारात आपली मजबूत पकड बसवलीआहे.
सॅमसंग पहिल्या क्रमांकावर
रिपोर्टनुसार गेल्या तिमाहीत (January-March 2024) अॅपलचेच्या स्मार्टफोन विक्रीत 9.6% ची घट झाली आहे. याकाळात अॅपलचे 5 कोटी स्मार्टफोन विकले गेलेत. तर Samsung च्या विक्रीत फक्त 0.7 % ची घट झालीय. जानेवारी-मार्च या काळात सॅमसंगने तब्बल 6 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे.
चीनी कंपन्यांची घोडदौड
या वर्षीच्या तिमाहित एकूण 28 कोटी 94 लाख (289.4 million) स्मार्टफोनची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 7.8% इतकी आहे. पण यात Samsung आणि Apple च्या विक्रीत थोडी घट झाली आहे. Samsung चं बाजारमूल्य 22.5% हून घटून 20.8% इतकं झालं आहे तर Apple चं बाजारमूल्य 20.7% हून 17.3% इतकं झालं आहे. दुसरीकडे Xiaomi आणि Transsion कंपन्यांच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
Xiaomi तिसऱ्या क्रमांकावर
स्मार्टफोन विक्रीच्या क्रमवारीत Xiaomi कंपनीनेही आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. Xiaomi तिसऱ्या क्रमांकावर आहे. Xiaomi स्मार्टफोनच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 34 टक्के वाढ झाली असून 4 कोटी 8 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. Transsion कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत तब्बल 85 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या कंपनीचे तब्बल 2 कोटी 85 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. तर Oppo ने Vivo ला मागे टाकत पाचवं स्थान पटकावलं आहे.
महागड्या फोनची खरेदी
रिचर्स कंपनी IDC च्या अहवालानुसार स्मार्टफोनचं मार्केट चांगली कमाई करत आहे. लोकांचा महागड्या स्मार्टफोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.