YouTube Income : उत्तर प्रदेशमध्ये एका YouTuber च्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) छापा टाकला. या छाप्यात त्या युट्यूबरकडून तब्बल 24 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तस्लीम खान (Taslim Khan) असं या युट्यूबरचं नाव असून अवैध पद्धतीने त्याने करोडो रुपये कमावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तस्लीम खान आपल्या भावाबरोबर मिळून Trading Hub 3.0 हे युट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलवर तो शेअर मार्केटशी (Share Market) संबंधीत व्हिडिओ टाकतो. यातून तो लाखो रुपये कमातो. पण प्रश्न असा आहे की YouTube मधून खरोखरच इतकी कमाई होते का? तस्लीमचा भाऊ फिरोजने YouTubeच्या माध्यमातून चांगली कमाई होत असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 1.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी आतापर्यंत 40 लख रुपये इन्कम टॅक्स भरल्याचा दावाही त्यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

YouTube वरुन कशी होते कमाई?
सध्या तरुणाई रिल्स बनवण्याची क्रेझ आहे. वेगवेगळ्या विषयांवर रिल्स बनवल्या जातात. त्यांच्या कंटेटवर येणाऱ्या जाहीरातीवरून पैसे मिळतात. हे पैसे वेगवेगळ्या कंटेंटनुसार कमी-जास्त असतात. वास्तविक YouTubeवरुन मिळणारे पैसे हे कंटेंट, रीजन आणि इतर गोष्टींवर अवलंबून असतात. कंटेंट क्रिएटर्सची 55 टक्के कमाई जाहीरातीतून होते. 


ही अट मान्य करावी लागते
युजर्सला YouTube Partner Program चा भाग असावा लागतं. तसंच क्वालीफाय होण्यासाठी चॅनेलवर 500 सबस्क्राईबर्स आणि 3000 तासांचा वॉचटाईम असावा लागतो. YouTube Shorts च्या माध्यमातूनही क्रिएटर्स कमाई करु शकतात. 


2022 डेटानुसार अमेरिकेतील युट्यूबर्स जवळपास 4600 डॉलर्स म्हणजे 3,77,234 रुपये महिन्याला कमवतात. युट्यूब क्रिएटर्सला 1000 व्ह्यूजवर 18 डॉलर म्हणजे 1558 रुपयांची कमाई होते. कंटेंट क्रिएटर्सची कमाई त्याचा कंटेंट किती स्ट्राँग आहे, प्रेक्षक, व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमावर ठरतो. 


याशिवाय YouTube Shorts, मेंबरशिप आणि इतर पद्धतीनेही पैसे कमावता येतात. तुमचा कंटेंट चांगला आणि आवडणारा असेल तर तुम्ही महिन्याला पाच आकड्यांचीही कमाई करु शकता. कंपनी क्रिएटर्सला त्याच्या YouTube चॅनेल आणि कंटेंटवर येणाऱ्या इंगेजमेंट तसंच व्ह्यूजच्या माध्यमातून पैसे मिळतात. ही रक्कम 100 डॉलर ते 10 हजार डॉलर्सपर्यंत असू शकते. युट्यूब व्हिडिओतील जाहिरातींच्या माध्यमातून कंपनीची कमाई होतेच आणि यातील काही हिस्सा क्रिएटर्सला दिला जातो.