नवी दिल्ली : व्हाट्सअपला टक्कर देणारे टेलिग्राम मॅसेजिंग ऍपने नुकतेच 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केला आहे. डाटा सेंसर टावरने याची माहिती दिली आहे. 2013 मध्ये या ऍपला बनवण्यात आले होते. या ऍपची स्पर्धा व्हाट्सअप फेसबुक मॅसेजरशी होती. व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसीच्या वादामुळे हे ऍप जास्त प्रसिद्ध झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंसर डाटाने म्हटले आहे की, टेलीग्रामने जगभरात 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केला आहे. या लिस्टमध्ये व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम,स्नॅपचॅट,  स्पॉटफाय आणि नेटफ्लिक्स चा सामावेश आहे. विशेष म्हणजे टेलिग्राम भारतात सर्वाधिक डाऊनलोड केले गेले आहे.


सेंसर डाटा टावरच्या मते भारतात साधाराण 22 टक्के लाइफटाइम इंस्टॉल मिळाले आहेत. भारतानंतर रशिया आणि इंडोनेशियामध्ये टेलिग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या अधिक आहे.


टेलिग्रामने म्हटले होते की,  कंपनीकडे साधारण 500 मिलियन मंथली ऍक्टिव वापरकर्ते आहेत. व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसीच्या वादामुळे नेटकरी नाराज होते. या पॉलिसीच्या विरोधात अनेकांना टेलिग्राम आणि सिग्नल सारखे ऍप इन्स्टॉल केले. त्यानंतर टेलिग्रामने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ग्रुप व्हिडिओ कॉल आणि स्क्रिन शेअरींगसारखे साउंड फिचर्सची सुविधा दिली होती.