मुंबई :  एखाद्या पॉवर बॅंकने पापणी मिटण्याआधीच मोबाई चार्ज झाला तर ? पहिल्यांदाच ऐकल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे शक्य आहे. टेस्ला या कंपनीने अशी एक पॉवर बॅंक बनविली आहे. 


पॉवर बॅंकला महत्त्व 


मोबाईल ही काळाची गरज बनत चालली आहे. दिवसभर मोबाईलचा उपयोग होत असल्याने त्याची चार्जिंग टिकून राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामूळे पॉवर बॅंकचे महत्त्व वाढले आहे. इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या टेस्ला कंपनीने पॉवर बॅंक लॉंच केली आहे.


सर्व प्रकारचे फोन चार्ज 


 एकदा मोबाईल चार्जला लावल्यावर तो पुर्ण चार्ज करुन देतो. ही पॉवर बॅंक अॅंण्ड्रॉइड आणि आयफोन असे सर्व प्रकारचे फोन चार्ज करु शकते.  या पॉवर बॅंकची किंमत ४५ डॉलर म्हणजेच साधारण २,९०० रुपये इतकी आहे. 


अधिक दमदार 


 टेस्लाची पॉवर बँक इतर बॅटरी पॅकपेक्षा फार वेगळी दिसत नाही, परंतु ती अधिक दमदार, अधिक शक्तिशाली आहे.


आऊट ऑफ स्टॉक


ही पॉवर बॅंक पातळ आणि कॉम्पेक्ट आहे. त्यामूळे याची ने आण सोपी होऊ शकते. कंपनीच्या वेबसाईटनुसार या पोर्टेबल चार्जरचा स्टॉक सध्या तरी विकलेला दाखवत आहे. 


इतर प्रोडक्ट 


कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक सेमी ट्रक और नया रोडस्टर लॉन्च केले आहे. 


ही कंपनी डेक्टटॉप सुपर चार्जही विकते. टेस्ला कंपनी ग्राहकांच्या इतर गरजांसाठीही बॅटरी तयार करते. 


टेस्ला पॉवरवॉल 


अशा प्रकारचा एक प्रोडक्ट म्हणजे टेस्ला पॉवरवॉल आहे. घरामध्ये वीज पुरवठा करण्याचे कामम टेस्ला पॉवरवॉल करते. आपत्ती किंवा विद्युत संकटाच्यावेळी हे डिव्हाइस विशेष काम करते.