मुंबई - भारतात व्हॉट्सअॅप सर्वात लोकप्रिय मेसेंजर अॅप आहे. व्हॉट्सअॅपचा वापर अनेक युजर्स करतात. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना एखाद्यावेळेस चुकीचा मेसेज एखाद्या ग्रुपवर जातो. अशा वेळी तो मेसेज डिलिट केला जातो. त्यामुळे तो इतरांना वाचता येत नाही. पण जर तुम्हाला डिलिट केलेला मेसेज वाचायचा असेल तर फार काही कष्ट करण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिलिट केलेले मेसेज अँड्राईड सिस्टिमच्या 'नोटिफिकेशन रजिस्टर'मध्ये स्टोअर केले जातात. डिलिट केलेले मेसेज जर तुम्हाला पाहायचे असतील, तर तुम्हाला प्ले स्टोअरवरुन 'नोटिफिकेशन हिस्ट्री' हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज वाचण्याची परवानगी द्यावी लागेल. फोटो आणि मीडिया अॅक्सेस द्यावे लागेल. यानंतर नोटिफिकेशन हिस्ट्री सेटिंगमधून व्हॉट्सअॅप नोटिफिकेशनला परवानगी द्यावी लागेल. या अॅपच्या मदतीने डिलिट केलेले मेसेज वाचता येऊ शकतात. यात फक्त व्हॉट्सअॅप नाही, तर मोबाईलवर येणारे हँगआऊट, एसएमएस आणि इतर नोटिफिकेशन्स पाहू शकता


या आहेत अटी


डिलिट झालेले मेसेज तुम्ही 'नोटिफिकेशन हिस्ट्री' या अॅपच्या माध्यमातून पाहू शकता. पण त्यासाठी काही अटी आहेत. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर डिलिट मेसेज वाचता येणार नाही. १०० अक्षरांनंतर मेसेज रिकव्हर करता येणार नाही. ही ट्रिक फक्त अँड्रॉईड युजर्ससाठीच आहे.


ही पद्धत वापरा


१. प्ले स्टोअरवरुन Notisave अॅप डाऊनलोड करुन, ऊघडा. 
२. हे अॅप सर्व नोटिफिकेशन रेकॉर्ड करते.
३. Notisave अॅप नोटिफिकेशन अॅक्सेससाठी परवानगी मागेल, यात तुमच्या हॅण्डसेटमधील फोटो आणि मीडियाला अॅक्सेस द्यावा लागेल.
४. युजर्सच्या समोर अनेक अॅप नोटिफिकेशनचे पर्याय दिसतील. त्यातून व्हॉटस्अॅप निवडायचं.
५. यानंतर Show On Status या पर्यायात व्हॉटसअॅप निवडा.
६. यानंतर सेटिंगमध्ये अॅप्लिकेशन एड डेट सुरु करा. यानंतर तुम्हाला डिलिट केलेले मेसेज पाहता येतील.