मुंबई : Desi Jugaad Video: देसी जुगाड कोणतेही काम सोपे करु शकतो. सोशल मीडियावर आपण जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. असे काही व्हीडिओ आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात. असा कसा जुगाड होऊ शकतो, या विचारात तुम्ही पडता. जुगाडचे हे व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना प्रचंड पसंत पडत आहेत. असाच एक जुगाडचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 


तुटलेल्या सायकलपासून बनवलेली स्कूटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जुगाड करुन काय केले, ते पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. वास्तविक, जुगाडच्या मदतीने या तरुणाने तुटलेल्या सायकलवरुन स्वत:साठी अशी स्कूटी तयार केली, जी पाहून लोकांनी सुखद धक्का बसला. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीकडे स्कूटी नसल्याचे दिसून येते. यानंतर त्यांनी तुटलेली सायकल चालवली आणि इको फ्रेंडली स्कूटी बनवली. यानंतर तो त्यावरुन स्टाईल मारताना दिसत आहे.


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती अतिशय स्टाईलमध्ये स्कूटी चालवत आहे. मात्र, तिला जवळून पाहताच समोरुन स्कूटी दिसत होती. ती स्कूटी नसून सायकल होती, असे स्पष्ट होते. माणसाने आपल्या कौशल्याच्या जोरावर सायकलला स्कूटी बनवली. विशेष म्हणजे ही स्कूटी पेट्रोलशिवाय चालते. जुगाडचा हा व्हिडिओ लोकांना खूप आकर्षित करणारा आहे. व्हिडिओ पाहा


इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by wait for end (@fun_life_4)


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर fun_life_4 नावाच्या पेजवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत अॅडमिनने हसणारा इमोजीही टाकला आहे. जुगाडचा हा व्हिडिओ लोकांना एवढा आवडला आहे की यूजर्स तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'पेट्रोलच्या किमतींमुळे त्रासलेल्या तरुणाने बनवली इको फ्रेन्डली स्कूटी.'