Android Phone Virus : अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांनी पुन्हा एकदा सावध राहण्याची गरज आहे.  कारण अँड्रॉईड फोन युजर्सना पुन्हा एकदा इशारा देण्यात आला असून एक अत्यंत धोकादायक मालवेअर स्पॉट झाल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे. हा मालवेअर तुमच्या बँक खात्याच्या सुरक्षिततेला धोका आहे. (these apps have dangerous virus if you are in smartphone then delete it immediately)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा नवीन मालवेअरमध्ये 'हार्ली' नावाचा वायरस आला आहे. हा वायरस Google Play install द्वारे डिव्हाइसला संक्रमित करत आहे. या  मालवेअरचे नाव DC Comics Universe च्या जोकरची फिक्शनची गर्लफ्रेड Harly Quinn वरून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जोकर व्हायरसने अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांचे मोठे नुकसान केले होते. Joker आणि Harly या दोन्ही वायरसमध्ये मोठा फरक आहे. जोकर मालवेअर डिव्हाइसवर इंस्टॉल झाल्यानंतर मैलेशियस कोड डाउनलोड करतो.


Harly कसे काम करते?


Joker  ट्रोजन प्रमाणे, हे देखील इतर अॅप्सची नक्कल करतात. Scammer प्रत्यक्षात Google Play वरून ऑर्डिनरी अॅप्स डाउनलोड करतात आणि त्यात मैलेशियस कोड टाकतात आणि नंतर तेच अॅप दुसऱ्या नावाने Google Play Store वर अपलोड करतात. त्यामुळे खऱ्या अॅपची फिचर same to same बनावट अॅपमध्ये दिसून येतात. परिणामी users चे देखील या बनावट अॅपमध्ये फसवणूक होऊन डाउनलोड करतात. 


हार्ली मालवेअर अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते लक्ष्यित वापरकर्त्यांना पेड सब्सक्रिप्शन करण्यास भाग पाडते. त्यानंतर हार्ली मालवेअर वापरकर्त्याच्या माहितीशिवाय महाग सबस्क्रिप्शन एक्टिवेट करतो. यामुळे, वापरकर्त्यांच्या बँक खात्यातून पैसे कापले जात आहेत आणि त्यांना याची माहिती नाही. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा मालवेअर 190 वेगवेगळ्या अँड्रॉईड अॅप्समध्ये दिसला आहे. हे अॅप 4.8 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहेत.


वाचा : दीवाळीच्या दिवशी करा हे उपाय तर वर्षभर लक्ष्मीची राहणार कृपा 


तुमच्या फोनवरून हे अॅप्स हटवा:-


Pony Camera


Live Wallpaper&Themes Launcher


Action Launcher & Wallpapers


Color Call


Good Launcher


Mondy Widgets


Funcalls-Voice Changer


Eva Launcher


Newlook Launcher


Pixel Screen Wallpaper


 


मालवेअर कसे काम करते?


ERMAC 2.0 मालवेअर Android फोनसाठी जास्त धोकादायक आहे. एखाद्या युजरने नकळत फसव्या अॅपद्वारे इन्स्टॉल केल्यावर त्याच्याकडून 43 प्रकारच्या परमिशन्स मागवल्या जातात. जर युजर्सने या परमिशन्स दिल्या, तर युजर्सच्या डिव्हाइसचे संपूर्ण नियंत्रण फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. अॅप डाउनलोड केल्यानंतर बहुतेक युजर्स या परमिशन्स देतात. यामध्ये एसएमएस ऍक्सेस, कॉन्टॅक्ट ऍक्सेस, सिस्टम अलर्ट विंडो तयार करणे, ऑडिओ रेकॉर्डिंग, पूर्ण स्टोरेज वाचणे आणि डिव्‍हाइसवर लेखन ऍक्‍सेस समाविष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा की, जेव्हा जेव्हा युजर्स कोणत्याही पोर्टलवर लॉग इन करतो तेव्हा हॅकर्सनाही त्यात प्रवेश मिळतो. यासह, बँकिंग साइटवर लॉग इन करून, वापरकर्त्याचे तपशील हॅकर्सकडे जातात आणि ते फसवणूक करतात.