अशा प्रकारे वाढवा फोनची बॅटरी लाईफ
सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. मात्र, अनेकजण हे फोनच्या बॅटरीमुळे त्रस्त असतात. तुम्हीसुद्धा याच त्रासामुळे त्रस्त झाला आहात तर मग काळजी करु नका. कारण आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.
नवी दिल्ली : सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. मात्र, अनेकजण हे फोनच्या बॅटरीमुळे त्रस्त असतात. तुम्हीसुद्धा याच त्रासामुळे त्रस्त झाला आहात तर मग काळजी करु नका. कारण आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.
तुमच्या फोनची बॅटरी लवकर डाऊन होत असल्याने अनेकदा फोन केवळ कॉलिंगसाठी वापरता? पण आज आम्ही तुम्हाला असा सल्ला देणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.
फोनचा योग्य पद्धतीने उपयोग नाही केला तर तुम्हाला त्याचा फटका नक्कीच बसेल. पण तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग केल्यास तुमच्या फोनची बॅटीरीही डाऊन होणार नाही आणि गरमही होणार नाही. पाहूयात काय आहेत या टिप्स...
१) तुमच्या फोनमध्ये असलेल्या अॅप्समधील काही अॅप तुम्ही वापरत नाहीत. तुम्ही वापरत नसलेले हे अॅप डिलीट करा.
२) मोबाईलमध्ये सुरु करण्यात आलेलं अॅप काम झाल्यावर नेहमी बंद करा आणि मगच फोन पाकीटात ठेवा.
३) मोबाईल फोन चार्ज करताना कुठल्याही चार्जरचा वापर करु नका. तर, केवळ तुमच्या फोनच्या चार्जरचाच वापर करा.
४) मोबाईल फोन संपूर्ण रात्रभर कधीही चार्जिंगला लावून ठेवू नका.
५) चार्जिंग होत असताना कधीही फोनचा वापर करु नका. यामुळे मोबाईलच्या बॅटरीवर खुप दबाव पडतो.