मुंबई : तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागत असल्याने त्रस्त आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, आता तुमचा स्मार्टफोन केवळ 30 सेकंदांत पूर्णपणे चार्ज करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इज्राईलची कंपनी स्टोरडॉट (StoreDot)च्या रिसर्चरने स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी एक खास बॅटरी डेव्हलप केली आहे. 


कंपनीने दावा केला आहे की, या बॅटरीमुळे तुमचा स्मार्टफोन अवघ्या 30 सेकंदांत पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो. मात्र, ही बॅटरी अद्याप बाजारात लॉन्च केलेली नाहीये. या बॅटरीत ऑर्गेनिक मटेरियल वापरण्यात आले आहेत त्यामुळे पर्यावरणाचंही नुकसान होत नाही. 


एका सेकंदात 100mAh चार्ज


स्टोरडॉट (StoreDot)ने 2014 मध्ये मायक्रोसॉफ्ट थिंक नेक्ट कॉन्फरन्समध्ये या सुपर-हाय चार्जर बॅटरीचा डेमो सादर केला होता. तसेच या ठिकाणी सॅमसंग गॅलक्सी S4 चार्ज करुन दाखवला होता. या फोनमध्ये 2600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 26 सेकंदांचा वेळ लागला. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला 100mAh चार्ज होते.


त्यामुळे जर तुमच्या फोनची बॅटरी 3000mAh असेल तर ती पूर्ण चार्ज होण्यासाठी 30 सेकंदांचा वेळ लागेल. 


अशी बनली आहे हे खास बॅटरी


स्टोरडॉटने या बॅटरीत एका नॅनोडॉटचा वापर केला आहे. त्यामुळे मायक्रो-ऑरगॅनिक मटेरियलच्या मदतीने इलेक्ट्रोलची क्षमता आणि इलेक्ट्रोलाइटची क्षमता वाढण्यास मदत होते. या बॅटरीच्या सहय्याने फोनच नाही तर टॅबलेटही चार्ज करता येतो.