मुंबई : भारताचा एक ब्रॅण्ड तब्बल 325 अरब रुपयांना विकत घेण्यात आलं आहे. ते नाव इतकं किंमती होतं की जगातील सर्वात मोठी कंपनी 'वॉलमार्टने' ते नाव 325 अब्ज रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ते नाव आहे, 'फ्लिपकार्ट'. 'फ्लिपकार्ट' भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे, आणि 'वॉलमार्ट'कडे नुकतीच या कंपनीची मालकी आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वॉलमार्ट' आणि 'फ्लिपकार्ट' यांच्यात झालेल्या सौद्याची एकूण किंमत १ हजार १०६ अब्ज रुपये होती. मात्र टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप न्यूज पोर्टलच्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे की, 'वॉलमार्ट'ने दाखल केलेल्या आपल्या वार्षिक 10-के फाइलमध्ये नमूद केले की, या सौद्यात 'फ्लिपकार्ट'चं नाव खरेदी करण्यासाठी 325 अब्ज रुपये दिले गेले. यूएसमध्ये नोंदणी केलेल्या सर्व कंपन्यांसाठी 10-के दाखल करणे अनिवार्य आहे.


या फाइलिंगनुसार, 'फ्लिपकार्ट' आणि त्यासंबंधित सर्व ब्रँडच्या नावांची किंमत विकत घेण्यासाठी किंमत दिली गेली. अशा प्रकारे, 'फ्लिपकार्ट'चे एकमेव नाव खरेदी करण्यासाठी 'वॉलमार्ट'ने एवढी मोठी रक्कम दिली. याचा अर्थ 'फ्लिपकार्ट'चे एकूण मूल्य 30% केवळ त्याच्या नावावर आहे.