मुंबई : येत्या होळीपूर्वी तुम्ही नवीन कार घ्यायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 3 लाख पेक्षा कमी असेल, तर हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण कोरोनाने ढासाळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना म्हणून, अनेक कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कार विक्रीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कंपन्यांमध्ये Maruti Suzuki आणि Datsun ने  बर्‍याच चारचाकी वाहनावर खूप मोठी सूट दिली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊयात. कोरोना साथीच्या आजारामुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. ज्याचा थेट  उत्पादनावर आणि पर्यायाने उद्योगधंद्यांवर वाईट परिणाम झाला होता. त्यात भारतातील अनेक कार बनवणाऱ्या कंपन्याही होत्या.


मात्र आता कार  विक्रीला  हळूहळू वेग येत असल्याने, अनेक कार निर्मात्या कंपन्यांनी विक्रीला प्रोत्साहन म्हणून, अनेक बम्पर ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. या मध्ये रेनोने (Maruti Suzuki) आणि  Datsun या कंपन्यानी आपल्या कारवर  45 हजार रुपयांपर्यंत सूट दिली आहे. ही ऑफर केवळ मार्च महिन्यापर्यंतच मर्यादीत आहे.


जर तुम्हा  Datsun Redi-Go या कंपनीची कार घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या कंपनीने आपल्या कारवर तब्बल 45 हजार रुपयांचे डिस्काउंट ऑफर दिली आहे.


कशी दिली जाणार ऑफर


कॅश डिस्काउंट एक्सचेंज बोनस कॉर्पोरेट डिस्काउंट
15,000 रुपये 15,000 रुपये पर्यंत 15,000 रुपये


Datsun Redi-Go


भारतीय बाजारात ०.८ लीटर आणि १ लीटर इंजीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचे ०.८ लीटर इंजिन ५६७८ आरपीएमवर ५४ पीएसचे पॉवर आणि ४३७८ आरपीएमवर ७२ एनएमचे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन दिले आहे. याचे १ लीटर इंजिन ५५०० आरपीएमवर ६८ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ९१ एनएनचे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे.


किंमत- भारतीय बाजारात Datsun Redi-Go कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत २.86 लाख रुपये आहे. तर Redi-Go याच्या टॉप माँडलची किंमत ४.८२ लाख रुपयांपर्यंत जाते. तर मारुती ऑल्टोची दिल्लीची एक्स-शोरूम किंमत 2 लाख 99 हजार रुपये पर्यंत आहे.


Maruti Suzuki Alto


जर तुम्हा  Maruti Suzuki Alto या कंपनीची कार घेण्याचा विचार करत असाल तर ह्या कंपनीने आपल्या कारवर  39,000 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. कॅश डिस्काउंट 20,000 रुपये, कंज्यूमर ऑफर 15,000 हजार रुपये. एक्सचेंज बोनस 4,000 रुपये राहाणार आहे.


मारुती सुझुकी बाजारात अल्टो इंजीन 6000 आरपीएमवर 48पी.एस ची जास्तीत जास्त पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69 एनएमची पीक
ट्रान्समिशनः ऑल्टो इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.