Free iPhone 16 Tapes To Mercedes Video: आयफोन 16 अगदी काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. अ‍ॅपलच्या चाहत्यांनी विक्रीच्या पहिल्याच दिवशी अ‍ॅपल स्टोअरमध्ये मोठी गर्दी केली. भारतामधील एकमेव अधिकृत स्टोअर असलेल्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील स्टोअरमध्येही पहिल्याच दिवशी आयफोन 16 च्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्याला हा नवा आयफोन कसा लवकरात लवकर घेता येईल यासाठी अ‍ॅपल चाहत्यांचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे दुबईमध्ये एका व्यक्ती चक्क हा नवा आयफोन मोफत वाटतोय.


मोफत वाटतोय आयफोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या व्यक्तीने आपल्या महागड्या मर्सिडीज कारवर नव्या कोऱ्या आयफोनेचे बॉक्स चिटकवले आहेत. जो आयफोन काढेल तो त्याचा मालक असेल अशा पद्धतीने तो आयफोन वाटत फिरतोय. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल झालाय.


काय आहे या व्हिडीओमध्ये?


शर्गिल खान नावाच्या व्यक्तीने कारवर आयफोन 16 चिटकवून मोफत वाटप केला जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे आयफोन मर्सिडीज जी-वॅगनवर चिकटपट्टीने चिटकवले आहेत. या कारवर चिटकवलेल्या बॉक्समध्ये खरोखर आयफोन आहे की ते रिकामे आहेत हे तपासण्यासाठी व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती कारबाहेर पडून या मर्सिडीजवरील एक आयफोनचा बॉक्स काढून उघडून बघते. त्यामध्ये खरोखरच आयफोन 16 दिसतोय.


पडला कमेंट्सचा पाऊस


हा व्हिडीओ 22 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर या व्हिडीओ एका लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. या व्हिडीओला 3200 हून अधिक लाईक्स असून दिवसोंदिवस ते वाढत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ही असली गाडी मला दिसली पाहिजे, असं एकाने म्हटलं आहे. "खरंच वाटतोय की केवळ मार्केटींग आहे?" असा प्रश्न अन्य एकाने विचारला आहे. "कोणीतरी प्लीज मला पण आयफोन द्या. अगदी जुना दिला तरी चालेल," असं अन्य एकाने म्हटलंय.



भारतात कितीला आहे आयफोन 16?


आयफोन 16 च्या सिरीजमध्ये एकूण 4 मॉडेल्स आहेत. यात आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतामध्ये आयफोन आयफोन 16 च्या 8 जीबी/ 128 जीबी मॉडेलची किंमत 79 हजार 900 रुपये इतकी आहे. हा आयफोनच्या नव्या सिरीजमधील सर्वात बेसिक मॉडेल आहे.