`How to...`, ट्रम्प जिंकल्यानंतर अमेरिकी जनत `हा` प्रश्न सर्वाधिक वेळा करतेय Google Search; कारण...
This Question Searches Increase After Donald Trump Victory in USA: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांना पराभूत करुन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा पराक्रम केला आहे. एक टर्म ब्रेक घेऊन दुसऱ्यांना राष्ट्राध्यक्ष होणारे ट्रम्प हे दुसरेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
This Question Searches Increase After Donald Trump Victory in USA: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काही आठवड्यांमध्ये यावर शिक्कामोर्तब होतील आणि जवळपास 70 दिवसांमध्ये ट्रम्प हे आर्थिक महासत्तेच्या सर्वोच्च पदावर दुसऱ्यांदा विराजमान होतील. मात्र ट्रम्प यांच्या या विजयामुळे अमेरिकेतली मोठा वर्ग नाखुश असल्याचं दिसत आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर गुगल सर्चसंदर्भातील रंजक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर गुगलवर एका ठराविक गोष्टींबद्दल सर्च करण्याचं प्रमाण तब्बल 400 टक्क्यांनी वाढलं आहे.
सर्वाधिक सर्च वाढलेला प्रश्न कोणता?
गुगल ट्रेण्ड्सच्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेमधून 'How to move to Canada' यासंदर्भातील सर्चचं प्रमाण वाढलं आहे. निकालाच्या रात्रीपासूनच या प्रश्नाबद्दल सर्च करणाऱ्या अमेरिकेतील नेटकऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे कमला हॅरिस यांना समर्थन करणाऱ्या व्हेरमॉट, ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या राज्यांमधून कॅनडाला कसं स्थलांतरित व्हायचं याबद्दल गुगल सर्च करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे.
या टर्म्स सर्च करणाऱ्यांची संख्याही भरमसाठ वाढली
याचबरोबर गुगल ट्रेण्ड्समध्ये अमेरिकेतून “moving to Canada requirements" आणि "moving to Canada from US” या दोन गोष्टींसंदर्भातील सर्चचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. ट्रम्प निवडणूक जिंकल्याचं ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशी कॅनडाबद्दलच्या सर्चमध्ये अमेरिकेतून तब्बल 5000 टक्के अधिक सर्च करण्यात आल्याचं गुगल ट्रेण्ड्सचा डेटा दर्शवतो.
नक्की वाचा >> S*x ला नकार, लग्नही नको, पुरुषांवर बहिष्कार... ट्रम्प जिंकल्याने अमेरिकन महिला आक्रमक; '4B मोहीम' चर्चेत
कॅनडीयन पंतप्रधानांनी वाढवलं टेन्शन
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी 2025 मध्ये कॅनडा कायमस्वरुपी स्थलांतरिकांची संख्या कमी करण्याचा विचार करत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. कॅनडामधील कायमस्वरुपी स्थलांतरितांची संख्या 21 टक्क्यांनी कमी करण्याचं ट्रूडो सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे आता 5 लाखांऐवजी 3 लाख 95 हजार कायमस्वरुपी स्थलांतरितांना कॅनडात आश्रय दिला जाणार आहे. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल ही शक्यता लक्षात घेत मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
या तीन देशांनाही पसंती
विशेष म्हणजे ट्रम्प यांची पुन्हा सत्ता येणार हे समजल्यानंतर ज्या देशांमध्ये स्थलांतरित होण्यासंदर्भात अमेरिकी लोक सर्च करत आहे त्यामध्ये जपान, ब्राझील आणि कोस्टा रिका या देशांचाही समावेश असल्याचं गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे.