पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई: दिवसेंदिवस बाजारात वाढणारी स्पर्धा पाहता पुढे भविष्यात स्मार्टफोन (smartphone) किती अपग्रेड होतील याचा आपण विचारच करु शकत नाही. कारण बाजारात विविध चांगले चांगले फोन (Best phone in the market)उपलब्ध होतात. असाच एक जबरदस्त Xiaomi चा फोन बाजारात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये काय विषेश वैशिष्ट्ये आहेत चला पाहूयात..


जबरदस्त कॅमेरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्टफोनच्या जगात, Xiaomi असे अनेक प्रयोग करते, जे भविष्यात तुम्हाला पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे कॅमेराच्या (Camera) बाबतीत. 108MP लेन्स (lens) असो की 200MP लेन्स असो. Xiaomi अशा काही ब्रँडपैकी एक आहे ज्यांनी नवीन तंत्रज्ञान (New technology) स्वीकारले आहे.


फोटोग्राफीचे युग


अशीच एक नवीन संकल्पना Xiaomi ने आणली आहे. ज्याची कल्पना बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, परंतु असा फोन अद्याप बाजारात आलेला नाही. स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर, कॅमेऱ्यांचे युग (The age of cameras) नाहीसे होईल असं नेहमीच अनेकांना वाटत होतं. काही प्रमाणात हे घडले असेल. म्हणजे काय तर स्मार्टफोन्स आल्यानंतर कॅमेऱ्यांचा वापर कमी झाला. फोटोग्राफीचे (photographay) युग डिजिटल कॅमेऱ्यांऐवजी फोनवर आले, पण कोणत्याही ब्रँडच्या फोनने कॅमेऱ्यांचा बाजार संपवला नाही. तरीही व्यावसायिक छायाचित्रणासाठी लोकं कॅमेराचा वापर करतातच.


Xiaomi 12S अल्ट्रा संकल्पना


Xiaomi कंपनीने Xiaomi 12S Ultra Concept Edition चा टीझर रिलीज केलाय. यात एक अद्वितीय रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये चांगल्या फोटोग्राफी करण्यासाठी एक चांगला लीका लेन्सचा (Leica lens) पर्याय उपलब्ध होणार आहे. चिनी कंपनीने आपल्या अधिकृत Weibo अकाउंटवरून नवीन टीझर व्हिडिओ आणि इमेज पोस्टर शेअर केले आहे. टीझरवरून हे स्पष्ट झाले आहे की हा स्मार्टफोन हाय-एंड डिव्हाइस (A smartphone is a high-end device) असेल. जो फोटोग्राफीसाठी अप्रतिम आणि जबरदस्त असेल.


1-इंचची लेन्स


नवीन स्मार्टफोनमध्ये 1-इंचाच्या प्राइमरी सेंसरसह कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा सेन्सर नंतर Leica M सीरीज लेन्सशी जोडला जाऊ शकतो. Xiaomi हा पहिला ब्रँड असेल ज्याच्या फोनवर पूर्ण Leica कॅमेरा लेन्स बसवलेले असतील. Xiaomi च्या म्हणण्यानुसार Xiaomi 12S अल्ट्रा कॉन्सेप्ट एडिशनला फ्लॅगशिप आणि प्रोफेशनल लेव्हल कॅमेराची कॉलेटी मिळेल. या फोनची संपूर्ण माहिती सध्या समोर आलेली नाही. परंतु Xiaomi केलेल्या दाव्यानुसार हा फोन बाजारात आला तर कॅमेरा कंपनीसाठी येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो.