Smartphone Tips - आपण सर्वजण दैनंदिन जीवनात स्मार्टफोन वापरतो. आपला मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. मात्र हाच स्मार्टफोन वापरताना आपल्याकडून काही अशा चुका होतात ज्यामुळे आपला फोन खराब होऊ शकतो. तुमच्यावर तुमचा फोन थेट कचऱ्याच्या डब्ब्यात फेकायची वेळ येऊ शकते. या बातमीतून आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवू शकाल. 


दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कायम असं पाहिलं गेलंय की आपण आपला चार्जर घरी ठेवतो किंवा कधीतरी सोबत ठेवायला विसरतो. अशावेळी ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठेही सवयीनुसार कुणाचा तरी चार्जर मागून फोन चार्ज करून घेतो. मात्र असं करणं तुमच्या फोनच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. असं करणं तुम्ही टाळलं पाहिजे. कारण दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्याने तुमचा फोन खराब होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून कायम तुमच्या मोबाईलसोबत कम्पॅटिबल चार्जर वापरा.  ( impact of using non compatible mobile charger )


टेम्पर्ड ग्लास  


ही चूक तर आपल्याकडून कायम होते. आपल्या फोनवरील टेम्पर्ड ग्लास खराब झाली असेल तर आपण आज बदलू उद्या बदलू म्हणून ही गोष्ट उद्यावर ढकलतो. अशात आपला फोन कुठे पडला तर मात्र आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. अशात तात्काळ चांगल्या क्वालिटीची टेम्पर्ड ग्लास बसवून घेणं अनिवार्य आहे.  (using quality tempard glass )


रात्रभर फोन चार्जिंगवर ठेवणं 


तुम्ही, आम्ही ही चुकही नेहमीच करतो. आपली कायमची एक सवय आपल्याला चांगलीच महागात पडू शकते. आपण रात्री झोपताना आपला फोन चार्जिंगवर ठेवतो आणि झोपी जातो. सकाळी आपल्याला फोन फुल चार्ज मिळतो खरा, मात्र त्याचा परिणाम तुमच्या फोनवर आणि बॅटरीवर होत असतो. यामुळे तुमच्या फोनचा परफॉर्मन्स खालावण्याची शक्यता असते. तुम्ही असं नेहमी करत असाल तर याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत पण दूरगामी परिणाम होत असतात. पण तुमचा फोन खराब होण्याची शक्यता असते. ( overnight phone charging ) 


three important smartphone tips will help you to keep your phone healthy and working