Popular Emoji and It's Meaning : सुरूवातीला मोबाईलचा कॉलसाठी जास्त प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आता चॅटिंग आणि वेगवेगळ्याप्रकारचे इमोजीचा ट्रेंड आला आहे. या चॅटिंगमध्ये इमोजीचा वापर शब्दांसह तुमचे भाव जोडण्यासाठी केला जातो. इमोजीद्वारे, आपण चॅटिंगमधून आपल्या भावना व्यक्त करू शकता आणि आपण आनंदी आहात की नाही किंवा आपल्या मनात काय आहे ते सांगू शकता. प्रत्येक जण चॅटिंगमध्ये याचा खूप वापर करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचदरम्यान सध्या अनेक देशांतील तरुणांमध्ये केलेल्या अभ्यासात थम्ब्स अप इमोजींबाबत जो ट्रेंड समोर आला आहे तो थक्क करणारा आहे. 'थम्स-अप' इमोजी, (Thumbs Up) म्हणजे तोच इमोटिकॉन जो बऱ्याचदा एकमेकांना अ‍ॅप्रूव्हल देण्यासाठी, कधी कधी काम व्यवस्थित पूर्ण झाल्याचं सांगण्यासाठी पाठवला जातो.पण या इमोजीचा खरा अर्थ तुम्हाला माहिते का? अर्थ जाणून तुम्ही पण थक्क व्हाल...


Thumbs-up इमोजीचा नेमका अर्थ काय?


'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यापुढे कोणीही थम्ब्स-अप वापरू नये, असे सांगण्यात येत आहे. कारण ते जुने झाले आहे आणि आता फक्त 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकच त्याचा वापर करतात.


लोक आता याला आक्रमकतेशी जोडताना दिसत आहेत. आजची तरुणाई याकडे आक्रमक आणि संघर्षमय म्हणून पाहत आहे. हे असभ्य वर्तनाचे लक्षण मानून तरुण पिढी सांगत आहे की, या इमोजीचा वापर कोणत्याही परिस्थितीत करू नये कारण त्यामुळे लोकांना त्रास होतो.


ऑफिस चॅटवर ही माहिती समोर आली


या अभ्यासात असे आढळून आले आहे की ऑफिसच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बहुतेक लोक बोलणे किंवा संवादावर फक्त एका अंगठ्याने उत्तर देतात. एक स्त्री म्हणाली, 'मला का माहित नाही, पण ते मला विरोधाभासी वाटले. कामाच्या ठिकाणी त्याचा अतिवापर केल्याने लोक मैत्रीच्या भावनेशी म्हणजे सांघिक भावनेशी विसंगत होऊ शकतात.\


वाचा : Ration Card धारकांसाठी वाईट बातमी; सरकारच्या नव्या आदेशामुळे कार्ड होणार रद्द, कारण काय?


वृद्ध लोकांकडून या इमोजीचा वापर


16 ते 29 वयोगटातील 2,000 तरुणांच्या अलीकडील अभ्यासानुसार, 'वृद्ध पुरुष' सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या इमोजींमध्ये थंब्स अप, रेड लव्ह हार्ट, ओके हँड आणि हसरा चेहरा यांचा समावेश आहे. म्हणजेच हार्ट इमोजी, क्रायिंग इमोजी आणि स्माईल इमोजी वृद्ध लोक जास्त वापरतात.


तज्ञांचे मत


बिझनेस कन्सल्टंट स्यू एल्सन यांच्या मते, अभ्यासाचे परिणाम तरुण पिढीच्या नवीन सुरुवातीचे लक्षण असू शकतात. त्यांचा असा विश्वास आहे की अनेक वर्षांपासून प्रतीकांपेक्षा व्यावसायिक चिन्ह (इमोजी) च्या जागी काही शब्द लिहिणे केव्हाही चांगले असते. कदाचित त्यामुळेच 'ऑल गुड' म्हणजेच ओके आयकॉनवर लोकांचा भ्रमनिरास कसा होतो, हे या अभ्यासात दिसून आले.


तुम्ही वृध्द  होत आहात हे तुम्हाला कसे कळेल?


अभ्यासानुसार, जर तुम्हालाही या 10 इमोजींमध्ये जास्त रस असेल तर सावधान. अभ्यासानुसार, या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 24% लोकांचा असा विश्वास होता की थम्ब्स अप इमोजी वाढत्या वयाचे संकेत देतात. या यादीत Red heart love, OK hand, Tick,  Poo, Loudly crying face, Monkey eye cover, Clapping hands, Lipstick kiss mark, Grimacing face  इमोजीचा वापर वाढत्या वयाशी संबंधित आहे.