नवी दिल्ली : अधिकतर स्मार्टफोन युजर्स सोशल नेटवर्किंग साईट्स सर्रास वापरतात. मात्र सातत्याने फेसबुक, इंस्टाग्राम आणि  व्हाट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया अॅप्सच्या वापराने अधिक डेटा वापरला जातो. कारण आपण दिवसभर त्याचा वापर करतो. त्यामुळे हे  अॅप्स दिवसभर अॅक्टिव्ह राहतात. त्यामुळे फोनचा डेटा लवकर संपतो. मात्र हा डेटा वाचवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. या मार्गांनी तुम्ही डेटाचा वापर नियंत्रणात ठेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक :


युजर्स आपला अधिकाधिक वेळ फेसबुकवर घालवतात. फेसबुकवर तुम्ही पहिले असेल की फेसबुकवर व्हिडीओ समोर येताच तो ऑटोमेटिक प्ले होतो. त्यामुळे तुमचा डेटा अधिक वापरला जातो. हा डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. यासाठी तुम्हाला प्रथम फेसबुक अॅपमध्ये जाऊन तीन डॉट वर क्लिक करा. मग सेटिंग मध्ये जा. सेटिंगमध्ये खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला व्हिडीओ ऑटो प्ले चा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला  WiFi Only सिलेक्ट करा किंवा ऑफ करा. त्यामुळे तुमचा मोबाईल डेटा अधिक खर्च होणार नाही. 


व्हाट्स अॅप : 
व्हाट्स अॅप तर आपण दिवसभर वापरतो. त्यामुळे अधिक डेटा वापरला जातो. यासाठी व्हाट्स अॅप सेटिंग मध्ये जावून डेटा युसेज वर क्लिक करा आणि लो डेटा युसेज ऑन करा. अजून एक मार्ग म्हणजे व्हाट्स अॅपच्या सेटिंगमध्ये जा. डेटा युज वर क्लिक करा. त्यात तुम्हाला खूप ऑप्शन्स दिसतील. त्यात पहिला पर्याय ऑटो मीडिया डाउनलोड वर क्लिक करा. त्यात तुम्हाला अजून दोन ऑप्शन्स दिसतील. त्यात वाय फाय ऑप्शनची निवड करा. त्यामुळे व्हाट्स अॅपवर येणारे व्हिडीओज अॅटोमेटिक डाउनलोड होणार नाहीत. असे केल्याने तुम्हाला हवे तेच व्हिडीओ इमेजेस तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतील.