Upcoming Cars In August 2022: ऑटोक्षेत्रात गेल्या काही महिन्यात तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या गाड्या गेल्या काही दिवसात लाँच झाल्या आहेत. जुन्या गाड्यांचे फेसलिफ्ट वर्जनदेखील बाजारात येत आहेत. ग्राहकांकडूनही गाड्यांची मागणी वाढत असल्याचं दिसत आहे. आता पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पाच गाड्या लाँच होणार आहेत. यापैकी काही गाड्यांची झलक जुलै महिन्यात दाखवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

New-gen Hyundai Tucson: चौथ्या पिढीची ह्युंदाई टस्कॉन भारतात 4 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता आहे. या गाडीत लेवल 2 ADAS सहित काही नवीन फीचर्स आहे. टस्कॉनमध्ये 2.0 लीटर नॅच्युअल एस्पिरेटेड आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डीजल इंजिन दिलं आहे. 


Toyota Urban Cruiser Hyryder: टोयोटा आपल्या ऑल-न्यू-मिड-साइज एसयूव्ही अर्बन क्रुझर हायरायडर 16 ऑगस्टला लाँच करू शकते. यात माइल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड असे दोन पर्याय आहेत. दोघांमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे.


Maruti Suzuki Grand Vitara: मारुति सुझुकी ग्रँड विटारा ऑगस्टमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. याच्या लाँचिग तारखेबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. 20 जुलैला या गाडीची झलक दाखवण्यात आली होती. 


New-gen Maruti Suzuki Alto: मारुति सुझुकीने नव्या पिढीची अल्टो लाँच करण्यासाठी कंबर कसली आहे. ही गाडी 18 ऑगस्ट लाँच करण्याची शक्यता आहे. यात डिझाईन आणि फीचर्स अपडेट केलं आहे. यात दोन इंजिन पर्याय मिळू शकतात.


Mercedes-AMG EQS 53: ऑल-न्यू Mercedes-AMG EQS 53 ही इलेक्ट्रिक सेडान कार 24 ऑगस्ट 2022 ला लाँच करण्याची शक्यता आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर असतील. हा बॅटरी पॅक 107.8 किलोवॅटचा असेल.