मुंबई : Toyota किर्लोस्कर मोटर (TKM) नं प्रिमीयम एचबॅक ग्लांजा Glanza या मॉडेलच्या तब्बल ६५०० कार परत मागवल्या आहेत. ग्लांजा ही कार मुळात बलेनो (Baleno) चंच एक रुप आहे. सध्याच्या घडीला ही कार कंपनीकडून परत मागवल्यामुळं कार असणाऱ्यांमध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Toyotaच्या म्हणण्यानुसार ज्यांच्याकडे २ एप्रिल २०१९ आणि ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यानच्या काळात तयार करण्यात आलेल्या Glanza कार आहेत, त्या सर्व कार परत मागवण्यात आल्या आहेत. कार डीलर्सच्या माध्यमातून कंपनी त्यांच्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचू शकणार आहे. फ्युअल पंप बदलण्यासाठी म्हणून या कार परत मागवण्यात येत असल्याचं कळत आहे.


Toyota आणि Suzuki ने मार्च २०१८ मध्ये भारतीय बाजारात एकमेकांना हायब्रिड आणि अन्य वाहनांच्या पुरवठ्यासाठी काही सामंजस्य करार केले होते. ज्याइंतर्गत टोयोटानं मारुतीपासून बलेनो घेत तिच्या डिझाईनमध्ये काही बदल करत ग्लांजा हे नवं मॉडेल बाजारात आणत त्याची विक्री केली होती. 


 


दरम्यान, याआधी मारुतीकडून सांगण्यात आल्यानुसार १५ नोव्हेंबर २०१८ पासून १५ ऑक्टोबर २०१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या Wagon R 1 litre आणि ८ जानेवारी २०१९ पासून ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत तयार करण्यात आलेल्या बलेनो (पेट्रोल) या कार परत मागवण्या आल्या.