नवी दिल्ली : तुमच्या मोबाईलला नेटवर्क असो किंवा नसो, आता तुम्हाला देशाच्या कोनाकोपऱ्यात कुठेही मोबाईल किंवा लँडलाईन नंबरवर विनासायास संपर्क साधता येऊ शकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या टेलेकॉम क्षेत्रातल्या शिखर संस्थेनं इंटरनेट टेलिफोनी सेवेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कमकुवत नेटवर्कची कटकट आता मिटू शकणार आहे. सिग्नल तसंच नेटवर्क खराब किंवा कमकुवत असतानाही, इंटरनेट टेलिफोनी म्हणजेच वायफायद्वारे कोणत्याही मोबाईल किंवा लँडलाईन फोनवर यामुळे विनाअडथळा संपर्क साधता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्वतंत्र सिमकार्डचीही गरज नसेल. संपर्काच्या या सहजसोप्या पद्धतीसाठी ट्रायला आता टेलेकॉम मंत्रालयाकडून हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे.


गावी गेलो, इमारतीच्या बेसमेंटला, प्रवासात आपल्यापैकी अनेकांना फोनला रेंज नाही एवढ्या कारणास्तव कॉल करता येत नाही. या नव्या निर्णयामुळे ही समस्या सुटणार असून, तुम्ही प्रवास करत असताना, अत्यंत दुर्गम भागात असतानाही तुम्हाला कॉल करणे सोपे होणार नाही. केवळ त्यासाठी इंटरनेट तुमच्याकडे असायला हवे.