वापरा या ट्रिक्स, कधीच होणार नाही डेटा लीक
डेटा लीक होण्यापासून कस वाचाव हा मोठा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतोय. यासंदर्भातील काही ट्रीक्स आपण जाणून घेऊया.
नवी दिल्ली : फेसबुक डेटा लीकप्रकरणी ५ कोटी यूजर्सची माहिती कॅंब्रिज एनालिटिका नामक कंपनीच्या हाती लागली. यामध्ये भारतीय युजर्सची माहितीही लीक झाली. फेसबुकनेही यासंदर्भात आपली चूक मान्य केली. डेटा लीक प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. पण डेटा लीक होण्यापासून कस वाचाव हा मोठा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतोय. यासंदर्भातील काही ट्रीक्स आपण जाणून घेऊया.
काय काळजी घ्याल ?
युजर्सला कोणत्याही लिंकवर क्लीक करण्याआधी लक्ष देणं गरजेच आहे. क्लिक केलेला कंटटे कोणत्या प्रकारचा आहे जे जाणून घ्यायला हवं. लिंक क्लिक केल्यावर आपण लगेचच एखाद्याला आपला डाटा शेअर करायची परवानगी देतो. तसेच अनेक महत्त्वपूर्ण माहितीही देतो.
काय आहे पद्धत ?
जेव्हा आपण स्मार्टफोनवर कोणंतही अॅप डाऊनलोड करतो तेव्हा आपल्या फोनचे एक्सेस मागितले जातात. पण कोणत्याही थर्ड पार्टीला एक्सेस देण्याआधी नियम आणि अटी वाचणे गरजेच आहे. जर खूप सारे अॅप डाऊनलोड केले असतील तर अशा पद्धतीन परमिशन बंद करता येऊ शकते.
५ स्टेप्समध्ये करा बंद
सेटींगमध्ये जा.
परमिशन ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर परमिशनचे खूप सारे ऑप्शन समोर येतील.
तुम्ही कोणत्या अॅपला स्मार्टफोनचा एक्सेस दिलाय हे कळेल.
जर तुम्हाला हे पटत नसेल तर परवानगी नाकारू शकता.
नियम आणि अटी पूर्णपणे वाचा
नियम आणि अटी वाचा
जर तुम्ही जूनं अॅण्ड्रॉइड वर्जन वापरताय तर सेटिंगमध्ये जाऊन 'परमिशन' सर्च करु शकता. जेव्हा आपण सोशल मीडियावर अकाऊंट बनवतो तेव्हा नियम आणि अटी मान्य आहेत असे लिहिलेल असतात. पण बहुतांशजण न वाचताच क्लिक करतात. त्यामूळे डेटा लीक होण वाचण्यापासून वाचायच असेल तर नियम आणि अटी पूर्ण वाचा.