मुंबई :  लोकप्रिय कॉलर आयडेंटिफिकेशन अ‍ॅप Truecaller ने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बंद केले जाणार आहे. Truecaller स्वत: याबद्दल आपल्या युजर्सना माहिती दिली आहे, की येत्या महिन्यापासून वापरकर्ते अ‍ॅपवरून व्हॉईस कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. या नवीन बदलाबद्दल जाणून घ्या संपूर्ण बातमी


Truecaller कडून यूजर्सना मोठा धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Truecaller ने एक नवीन घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते 11 मे पासून अ‍ॅपद्वारे त्यांचे कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. Truecaller ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत कॉल रेकॉर्डिंग फीचर सर्व यूजर्ससाठी मोफत होते, पण आता हे फीचर अ‍ॅपमधून पूर्णपणे काढून टाकले जात आहे.


काय आहे या मागचे कारण?


Truecaller ने अचानक हे पाऊल का उचलले? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यामागे Google ची नवीन Play Store पॉलिसी आहे. त्यानुसार, रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी API ची विनंती केली जाऊ शकत नाही, याचा अर्थ अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी परवानग्या मिळवण्याचा पर्याय नसेल.


कॉल कसे रेकॉर्ड करायचे


Truecaller आणि इतर अ‍ॅप्सवरून हे वैशिष्ट्य काढून टाकल्यानंतर कॉल रेकॉर्ड करणे अशक्य वाटत असले तरी, तसे नाही. जर तुम्ही असा स्मार्टफोन वापरत असाल ज्यामध्ये कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा आधीपासूनच आहे, तर तुम्ही हे वैशिष्ट्य वापरू शकता. हा बदल फक्त थर्ड पार्टी अ‍ॅपसाठी करण्यात आला आहे.