Cheapest Sports Bike in India: तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणाऱ्या टीव्हीएस अपाचेने (TVS Apache) पुन्हा एकदा रेकॉर्ड केला आहे. भारतीय स्पोर्ट्स बाइक (Indian Sports Bike) म्हणून प्रसिद्ध असणारी टीव्हीएस अपाचे संपूर्ण जगभरात विकली जाते. आतापर्यंत 50 हजार युनिट्स विकण्यात आले असून, अद्यापही विक्री सुरु आहे. 2005 मध्ये लॉन्च झालेली अपाचे अनेक मोठ्या ब्रँड्सना टक्कर देत आहे. भारतातील सर्वात स्वस्त आणि प्रसिद्ध असणाऱ्या बाईक स्प्लेंडर (Splendor) आणि प्लॅटिनालाही (Platina) या बाईकने घाम फोडला आहे. आपल्या पिकअप, मायलेज आणि लुक्समुळे अपाचेला नेहमीच लोकांची पसंती मिळत असून, प्रसिद्ध बाईक ठरत आहे. ही बाईक जगभरातील तब्बल 60 हून अधिक देशांमध्ये विकली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीएस अपाचेच्या 5 मॉडेल्सची बाजारात विक्री केली जाते. याची किंमत 1 लाख 18 हजारांपासून सुरु होते. टीव्हीएस सध्या अपाचेची 60 देशांमध्ये विक्री करते. 


अडीच वर्षात तोडला रेकॉर्ड


मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये अपाचेच्या 4 मिलियन युनिट्सची विक्री झाली होती. यानंतर गेल्या अडीच वर्षात कंपनीने रेकॉर्डब्रेक 10 लाख युनिट्सची विक्री करत हा आकडा 5 मिलियनवर पोहोचवला आहे. यासह टीव्हीएस जगभरात वेगाने आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवत आहे. 


कंपनीचे बिझनेस हेड विमल संबुली यांनी सांगितलं आहे की, टीव्हीएस अपाचेने 50 लाख दुचाकींची विक्री करत जागतिक स्तरावर एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. आम्ही यापुढेही ग्राहकांना उत्तम प्रोडक्टसह अपडेट करत राहू. अपाचेशी लाखो रायडर्स जोडले गेले आहेत. यामध्ये अपाचे ओनर ग्रुप, अपाचे रेसिंग एक्स्पिरियन्स आणि अपाचे प्रो परफॉर्मन्स सहभागी आहेत.