नवी दिल्ली : भारतात हाय रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर्सची जास्त व्हराइटी नाही.  तरीसुद्धा अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये बसतील. त्यात बजाजची Chetak Electric चा सुद्धा सामावेश आहे. देशातील दोन्ही दिग्गज वाहन निर्माण करणाऱ्या कंपन्या, TVS आणि बजाजने इलेक्ट्रिक वाहन सेग्मेंटमध्ये एन्ट्री केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TVS ने iQube आणि बजाजने Chetak ला लॉंच केले आहे. दोन्ही स्कूटर्सची आपली वेगळी ओळख आहे.  जाणून घेऊ दोन्ही स्कूटर्स संदर्भात


TVS iQube मध्ये 4.4kW ची पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 40 किमी प्रती तासाचा वेग पकडते. यात 2.25 kWh क्षमतेच्या lithium -ion बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने या स्कूटरला विशेष अशा SmartXonnect प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.  यात आधुनिक TFT क्लस्टर आणि कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आले आहेत. यात डे नाईट डिस्प्ले, क्यू-पार्कअसिस्ट, मल्टी सिलेक्ट इकोनॉमी आणि पॉवर मोड रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसारखे जबरदस्त फीचर्स आहेत.


Bajaj chetak भारतीय बाजारात Urban आणि Premium सारख्या दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहेत. सिंगल चार्जिंगवर ही स्कूटर 95 किलोमीटर पर्यंत धावू शकते. यात दोन रायडींग मोड आहेत. त्यात सिटी आणि स्पोर्ट्स यांचा सामावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.1 kW इलेक्ट्रिक मोटार आहे. 5 Aच्या चार्जिंग सॉकेटवर 5 तासात पूर्ण चार्ज करता येणे शक्य आहे.