TVS iQube Festive Offer: दिवाळी सुरू होण्याच्या आधीच अनेक ऑफर्सचा भडिमार केला जातो. ई-कॉमर्स वेबसाइटसह अनेक ऑटो आणि टेक कंपन्यांही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स देत असतात. अशातच दिवाळीसाठी देशातील लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी असलेली TVS Motorsने देखील ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर हि माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TVS Motors कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट देत आहे. तुम्ही देखील या फेस्टिव्ह सीझनमध्ये स्कुटर खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर TVS iQube ही स्कुटर खरेदी करु शकता. या स्कुटरवर कंपनी 10 हजार रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. ही स्कुटर एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपर्यंते रेंज देते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कुटवर कंपनी 10,000 पर्यंतचे डिस्काउंट ऑफर करण्यात आले आहे. याचबरोबर स्कुटर खरेदीवर कंपनी 7500 रुपयांचा कॅशबॅकदेखील देत आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक स्कुटरच्या खरेदीवर No Cost EMIचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. तर, ग्राहकांना 70000 किंवा 5 वर्षांपर्यंत वॉरंटी वाढवू शकतात. 


स्कुटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या इलेक्ट्रिक स्कुटरची एक्स शोरुम किंमत 1.55 लाख इतकी आहे. यात चार्जर आणि जीएसटीची रक्कमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर 21131 रुपयांची फेम-2 सबसिडी मिळणार आहे. तर, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 17000च्या सबसिडीनंतर इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.17 लाख रपये इतकी आहे. या किंमतीवरदेखील तुम्हाला 10,000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काउंट मिळणार आहे. 


कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन कलरच्या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याची टॉप रेंज 100 किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच ही स्कुटर सिंगल चार्जवर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर 0-80 टक्के चार्जिंग 4.30 तासात पूर्ण करते. 


कंपीनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 21 स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. यात जिओफेसिंग, नेव्हिगेशन असिस्टस, रिमोट चार्जसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. तर, स्कुटरमध्ये 3.04 किलोवॉटची लिथियम आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. या स्कुटरमध्ये वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंसदेखील मिळते.