नवी दिल्ली : टीव्हीएस मोटर्सने आपली लोकप्रिय  स्टार सिटी प्लस बाईक नव्या रुपात नव्या ढंगात बाजारात आणलीये. या नव्या स्टार सिटीची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये किंमत ५०,५३४ रुपये ठेवण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सणांचा हंगाम सुरु होताच कंपन्या नव्या उत्पादनांचे लाँचिंग करणे सुरु करतात. यातच दुचाकी बनवणाऱ्या अग्रगणी कंपन्यापैकी एक टीव्हीएसने आपल्या स्टार सिटी प्लसच्या श्रेणीतील नवी बाईक लाँच केलीये. 


दिल्लीतील एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत ५०, ५३४ रुपये आहे. नव्या रुपात सादर कऱण्यात आलेल्या या बाईक ड्युअल कलरमध्ये असणार आहेत. काळा-लाल, लाल-काळा आणि काळा-निळा अशा रंगसंगतीमध्ये बाईक उपलब्‍ध असणार आहेत. 


या बाईकचा मायलेज ८६ किमी प्रतिलीटर इतका आहे. त्यामुळे पेट्रोलसाठी तुम्हाला खिशाला परवडणारी अशी ही बाईक आहे. यात ११० सीसीचे इंजिन आहे. तसेच यात ४ स्पीड गियरबॉक्स देण्यात आलाय. बाईकमध्ये दोन रंगसंगतीसह ऑटो हँडलँप ऑन फीचर देण्यात आलाय. तसेच या बाईकमध्ये ट्युबलेस टायर्स देण्यात आलेत.