Twitter Verification : Elon Musk यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये अनेक बदल केल्यानंतर सोमवारपासून (12 December) ट्विटवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शनला सुरूवात झाली. यासोबतच ट्विट एडिट बटणासह इतर फिचर्सही लाँच करण्यात आले आहे. तसेच याआधी फेक अकाउंट्सला ब्लू टिक मिळाल्यानंतर या सब्सक्रिप्शन सर्विसला बंद करण्यात आले होते. याशिवाय, ट्विटर अकाउंट्सला वेगवेगळे कलरचे टिक सुद्धा दिले जात आहे. आतापर्यंत सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्सना निळ्या रंगाची टिक दिली जात होती. परंतु आता त्यापैकी अनेकांना सोनेरी टिक्स देण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.  (Twitter Account Verification Program) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेड वेरिफिकेशनबाबत सध्या कोणताही निर्णय नाही


ट्विटरचे पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. याची किंमत अजूनही महिन्याला 8 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु आता Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार आहे.   


ट्विटर अकाउंट व्हेरिफिकेशन आता वेगवेगळ्या रंगात


ट्विटर ब्लू पुन्हा लाँच केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. ट्विटर अकाउंटला आता तीन रंगीत टिक मार्क्स मिळत आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार हे टिक मार्क दिले जात आहेत. Twitter ब्लू सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना अतिरिक्त फायदे दिले जातात. यामध्ये कंपन्यांसाठी 'गोल्डन टिक', तर सरकारी संस्थांसाठी 'ग्रे टिक' मिळेल. त्याचबरोबर वैयक्तिक श्रेणीसाठी पूर्वीप्रमाणेच 'ब्लू टिक' दिली जाईल. नवीन ऑटोमॅटिक सिस्टीम तयार होईपर्यंत ही सर्व अकाऊंट्स सध्या मॅन्युअली व्हेरिफाईड केली जातील.       


वाचा: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्‍यांना धमकी 


सरकारी लिंक्ड खाती खाली लेबल


ट्विटरवर नवीन अपडेट नंतर सरकार संबंधित अकाउंट्सच्या खाली लेबल दिले जात आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या अकाउंट्सच्या खाली पाहिले जावू शकते. यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, इंडियन गव्हर्मेंट ऑफिशियलचे अकाउंट आहे. सध्या कंपनीने भारतातील किंमतीवरून काही म्हटले नाही. त्यामुळे हे स्पष्ट नाही की, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात किती रुपये खर्च करावे लागतील. कंपनी लवकरच यासंबंधी माहिती देवू शकते. ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांना अतिरिक्त बेनिफिट्स दिले जाते. यूजर्सला कमी जाहिराती पाहायला मिळू शकतात.


काय सुविधा मिळणार


- केलेले ट्विट 30 मिनिटांच्या आत ट्वीट एडिट करता येतील.


- 1080p व्हिडिओ देखील अपलोड करता येऊ शकतो. यासोबतच लांबलचक ट्विटही करता येतील.


- सबस्क्रिप्शन युजर्सनां इतर युजर्सच्या तुलनेत 50 टक्के कमी जाहिराती दिसतील.


- युजर्सने प्रोफाइलवरील फोटो किंवा नाव बदलले तर त्यांची ब्लू टिक काढून टाकली जाईल आणि पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा ब्लू टिक दिली जाईल.


- सबस्क्रिप्शन सेवेची किंमत प्रति महिना $8 डॉलर असेल, तर Apple iOS साठी साइन अप करण्यासाठी प्रति महिना $11 डॉलर खर्च येईल.