Twitter Verified: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच ट्विटरचा (Twitter) ताबा घेतला. तेव्हापासून मस्क यांनी अनेक बदल केले आहेत. यानंतर आता ट्विटरवर दिलेल्या ब्लू टिक्ससाठी (Twitter Blue Tick) शुल्क आकारलं जाऊ शकतं, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे नेटकऱ्यांची तारंबळ उडाली होती. अशातच आता केंद्रीय मंत्र्याने (Govt Of India) या सर्व प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटर (twitter) युजर्सच्या अकाउंटची पडताळणी करण्यासाठी आणि ब्लू टिक (Blue Tick) देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. भारतीय चलनानुसार त्याचे 415 रुपये होतात. त्यामुळे आता भारतात देखील पैसे द्यावे लागतील का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर आता केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्टीकरण दिलं.


काय म्हणाले राजीव चंद्रशेखर ?


ट्विटरने हे केले नाही. ही बातमी कोणीतरी चालवली आहे. ट्विटरने याला दुजोरा दिलेला नाही. त्यांना काय म्हणायचे आहे ते सांगू द्या आणि मग आम्ही कमेंट करू. मी अंदाज बांधण्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.


आणखी वाचा - Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या


काय म्हणाले होते Elon Musk ?


ट्विटर (twitter) आपली युजर व्हेरिफिकेशन (User Verification) प्रक्रिया बदलणार आहे. रविवारी ट्विटरवर ब्लू टिक (Blue Tick) काढण्यासंदर्भात ट्रेंडही सुरु होता. त्यामुळे आता युजर व्हेरिफिकेशनची (User Verification) प्रक्रिया बदलणार आहे. सध्या संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला जात आहे.