How To Delete Your Old Tweet : आजच्या डिजिटल युगात अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यातच ट्विटर हे एक व्यासपीठ आहे जिथे आपण आपले मत उघडपणे मांडत असतो.  पण कधी कधी हे जुने ट्विटही लोकांना अडचणीत टाकतात. ही समस्या सेलिब्रिटींमध्ये अधिक आहे. दरम्यान एखाद्या विशिष्ट प्रसंगी जुने परस्परविरोधी ट्विट काढून सेलिब्रिटींना ट्रोल केले जाते. तुम्हीही कोणतेही आक्षेपार्ह किंवा विरोधाभासी ट्विट केले असेल आणि त्या ट्विटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका,  कारण  आता तुम्ही जुने ट्विट सर्च करून डिलीट करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या युक्तीने जुने ट्विट डिलीट करा


जर तुम्ही ट्विट पोस्ट केले असेल तर तुमच्या पेजवर ट्विट असणार. पण अशावेळी जुने ट्विट एकामागून एक शोधणे खूप आव्हानात्मक असते. त्यावेळी सुरूवातीला इंटरनेट ब्राउझरमध्ये https://twitter.com/search-advanced (URL) टाका.


ही URL टाकल्यानंतर एक पेज उघडेल. यामध्ये तुम्ही तारीख टाकून तुमचे ट्विट शोधू शकता. तुम्ही ट्विटर हँडलचा पत्ता प्रविष्ट करू शकता ज्याचे जुने ट्विट तुम्हाला येथे काढायचे आहेत.


आता तुम्ही तुमचे ट्विटर युजर नेम (user name) टाकताच तुमच्यासमोर तुमचे जुने ट्विट असतील.


 त्याचबरोबर मोबाईल अॅपवरही तुम्ही जुने ट्विट वेगळ्या पद्धतीने शोधू शकता.


जसे की, सुरूवातीला ट्विटर खात्यावर जाऊन प्रोफाइलला भेट द्या. त्यानंतर वरच्या बाजूला सर्च ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.


तुम्ही जे ट्विट् शोधत आहात ते वर्ष सर्च मध्ये टाका.  पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही सर्च टाईपमध्ये एखादे वर्ष टाकून सर्च करत असाल तर त्या वर्षातील सर्व ट्विट तुमच्या समोर असतील. तुम्ही कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा नावाने जुने ट्विट शोधू शकता.