Twitter Bule Tick : PM मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक `गायब`
ट्विटरवर मोठे बदल, व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक गायब, काय आहे ट्विटरची नवी पॉलिसी
Twitter Bule Tick : सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या ट्विटर (Twitter) या मायक्रोब्लॉगिंग साईटबाबत ट्विटरचे नवे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी मोठी घोषणा केली होती. ट्विटर ब्लू टिकसाठी (Blue Tick) म्हणजेचं व्हेरिफाईड ट्वीटर अकाउंट (Verified Twitter Account) वापरण्यासाठी युजर्सना विशेष सबस्क्रीपशन (Subscription) घ्यावं लागतं. याशिवाय तीन रंगाचे टिक आणले आहेत. याआधी व्हेरिफाईड अकाऊंटसाठी ब्लू टिक दिला जात होता. यामध्ये आता बदल करण्यात आला असून याचे परिणाम आजपासून दिसायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Ami Shah) यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) ब्लू टिक (Twitter Blue) काढून टाकण्यात आला आहे.
ब्लू टिक का काढलं?
व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकलं म्हणजे ते अकाऊंट आता व्हेरिफाईड नाही असा त्याचा अर्थ नाही. ज्या अकाऊंटच्या पुढे ब्लू टिक दिसत होता, त्याऐवजी आता राखाडी रंगाचा टिक (Grey Tick) देण्यात आला आहे. त्यामुळे पीएम मोदी, अमित शहा यांच्यासह India government official च्या ट्विटर हँडलवरही राखाडी रंगाचा टिक दिसत आहे. हे बद नव्या व्हेरिफिकेशन सिस्टमअंतर्गत (Verification System) केले जात आहेत.
या नेत्यांच्या अकाऊंटवर ग्रे टिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आला आहे. आता त्यांच्या नावापुढे राखाडी रंगाचा टिक दिसत आहे. केवळ सरकारशी संबंधित लोकांना ग्रे टिक दिलं जाईल असं कंपनीने आधीच स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अद्याप ग्रे टिक देण्यात आलेला नाही. तसंच विरोधी पक्षांतील नेत्यांच्या नावापुढे ग्रे टिक लागणार की नाही हेही अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. बिझनेस अकाऊंटला गोल्ड टिक (Gold Tick) देण्यात आला आहे.
सरकारशी संबंधित अकाऊंटसना ग्रे आणि सामान्य युजर्सना ब्लू टिक सबस्क्रिप्शन दिलं जाणार आहे. सामान्य युजर्सच्या अकाऊंटसवर येणाऱ्या काळात ग्रे टिक दिसू शकतो.
एलन मस्कविरोधात नाराजीचा सूर
एलन मस्क यांनी एक पोल घेतला होता, यात त्यांनी आपण ट्विटरचं मुख्य पद सोडावं की नाही, असा प्रश्न विचारला होता. यात 17 लाख लोकांनी भाग घेतला होता. पण सर्वाधिक लोकांनी पद सोडावं या बाजूने मत दिलं होतं. यावर आता कंपनी नव्या पॉलिसीबाबत विचार करत आहे. या पॉलिसीअंतर्गत केवळ ब्लू टिक असणाऱ्या सब्सक्राइबर्सनाच मतदानाचा अधिकार असेल. याशिवाय कंपनीने पेड सर्व्हिसही सुरु केली आहे. यात तुम्ही पैसे देऊन ट्विटरवर आपल्या नावापुढे पुढे ब्लू टिक वापरु शकता. याची किंमत साधारण 999 रुपये इतकी असल्याचं बोललं जात आहे.