एलन मस्क ट्विटरचा नवा बॉस, खरेदीसाठी लावली इतकी मोठी बोली
Twitter Takeover : आताची मोठी बातमी. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं ट्विटर एलन मस्क (Elon Musk) यांनी खरेदी केले आहे.
वॉशिंग्टन : Twitter Takeover : आताची मोठी बातमी. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं ट्विटर एलन मस्क (Elon Musk) यांनी खरेदी केले आहे. (twitter sold) तब्बल 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले आहे. ट्विटरकडून एलन मस्क यांना कंपनी विकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्विटरच्या डीलवर व्हाईट हाऊसने चिंता व्यक्त केली आहे.
स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी तब्बल 44 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 हजार 368 कोटींना ट्विटर विकत घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये सर्वाधिक 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला होता. आशा करतो की माझे टीकाकारही ट्विटरवर कायम राहतील, याचाच तर अर्थ आहे फ्री स्पीच, असं ट्विट मस्कनं ट्टविटर खरेदी केल्यानंतर केले आहे.
तर ट्विटरचे मालक कोण हे महत्त्वाचे नाही, असं व्हाईट हाऊसनं म्हटले आहे. पण सोशल मीडियाच्या क्षमतेबाबत बायडेन चिंतेत आहेत, असं व्हाईट हाऊसने म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, ट्विटर शेअरधारकांना व्यवहाराची शिफारस करण्यासाठी त्याच्या बोर्डाची बैठक झाल्यानंतर ट्विटर $43 अब्ज कराराची घोषणा करु शकते.
ट्विटर पूर्वीपेक्षा चांगले होणार !
ट्विटरच्या नवीन बॉसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना नवीन वैशिष्ट्ये, ओपन सोर्स अल्गोरिदमसह ट्विटरला पूर्वीपेक्षा चांगले उत्पादन बनवायचे आहे. जेणेकरून अल्गोरिदम ओपन सोर्स बनवता येईल आणि स्पॅमर्सना पराभूत करुन विश्वास वाढवण्यासाठी सर्व मानवांसाठी प्रमाणीकृत केले जाऊ शकते. टेस्लाच्या सीईओने पुढे लिहिले, 'ट्विटरमध्ये मोठी क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे.
मस्क यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
त्याचवेळी, ट्विटर खरेदी केल्याबद्दल एलन मस्क यांचे सतत अभिनंदन होत आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'टाउनमधील न्यू शेरीफ, एलन मस्क यांचे अभिनंदन. आम्ही तुम्हाला सर्वांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करु इच्छितो. एका यूजरने लिहिले की, एलन मस्क आता आमचे ट्विटर लँडलॉर्ड आहेत. त्याचप्रमाणे दुसर्याने लिहिले आहे की एलन मस्कयांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर निलंबित खाती परत केली जातील.