Twitter युजर्ससाठी मोठी अपडेट! एलॉन मस्कची पुन्हा नवीन घोषणा
Twitter Accounts : ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क मोठा निर्णय घेतला असून लवकरच इनअॅक्टिव्ह अकाउंट्स बंद करण्यात येणार आहेत.
Twitter Remove Inactive Accounts : सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म पैकी असणाऱ्या ट्विटरने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय, ब्लू टिक हटवण्याचा निर्णय असे अनेक निर्णय घेत ट्विटर युर्जसला धक्के दिले आहेत. त्यातच आता ट्विटर युजर्ससाठी मोठी बातमी समोर येत असून जे ट्विटर अकाउंट अनेक वर्षांपासून कोणतेही काम करत नाही, ते खाते बंद करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. यामुळे अनेक युजर्सच्या फॉलोअर्सची संख्या कमी होऊ शकते असे कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांचे म्हणणे आहे.
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली खाती बंद केली जातील. दरम्यान, ट्विटरवर अशी हजारो खाती आहेत, जिथे एकही पोस्ट शेअर केली जात नाही. त्यामुळे ट्विटरकडून असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ट्विटरने गेल्या महिन्यात हजारो सेलिब्रिटी, पत्रकार आणि प्रमुख राजकारण्यांच्या खात्यांमधून मोफत ब्लू टिक काढून टाकले. कारण ट्विटरने ब्लू टिक्ससह पेमेंट सबस्क्रिप्शन सुरू केले. केवळ अनेकांनी त्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून कंपनीने ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला.
जे त्यांचे खाते नियमितपणे वापरत नाहीत, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लवकरच कमी होऊ शकते. ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साइट आहे, लवकरच कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापांसाठी खाती हटवण्यास सुरुवात करणार आहे. वापरकर्त्यांना त्यांचे ट्विटर खाते कायमचे बंद होण्यापासून रोखण्यासाठी महिन्यातून किमान एकदा त्यांच्या खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे, असे ट्विटरचे धोरण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी नॅशनल पब्लिक रेडिओने 52 ट्विटर अकाऊंट दुसऱ्या कंपनीला देण्याची धमकी दिली होती. या मागचे कारण म्हणजे त्या खात्यांनी Twitter फीडवर कंटेट पोस्ट करणे बंद केले होते.
ट्विटर 150 कोटी खाती हटवणार
याआधी एलॉन मस्क यांनी करोडो निष्क्रिय ट्विटर खाती काढून टाकण्याची घोषणा केली होती. मस्क यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, 'ट्विटर लवकरच 1.5 अब्ज (150 दशलक्ष) खात्यांची जागा मोकळी करेल. मस्क यांच्या निर्णयामुळे युजर्सला फायदा होईल. परंतु ते मिळू शकले नाही कारण कोणीतरी आधीच घेतले आहे. पण मस्क यांच्या निर्णयामुळे संधी तर मिळेलच, पण त्यामुळे ट्विटरच्या वापरकर्त्यांची संख्याही घटणार आहे.