लॉस एंजिलिस : उडणारी टॅक्सी ही कल्पनाच स्वप्नवत वाटते. मात्र लवकरच ही स्वप्नवत कल्पना सत्यात उतरू शकते. यासाठी टॅक्सीची सुविधा देणाऱ्या  उबर (UBER) या कंपनीने अमेरिकेच्या प्रमुख अंतरिक्ष संघटना (NASA) सोबत हातमिळवणी केली आहे. उडत्या टॅक्सिचे भाडे देखील सामान्य टॅक्सीप्रमाणेच आकारले जाईल. म्हणजेच जर तुम्ही उडत्या टॅक्सीतून प्रवास करणार असाल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उबरने 'उबर एयर' (uber air) पायलट योजनेमध्ये लॉस एंजिलिस देखील भागीदार आहे. यापूर्वी फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई या योजनेत सहभागी झाले होते. उबरने सांगितले की, "नासाच्या यूटीएम परियोजनेत उबरची भागीदारी कंपनी २०२० पर्यंत अमेरिकेच्या काही शहरांमध्ये उबर एयरची विमान सेवा प्रयोगिक तत्त्वावर सुरु करण्याचे माझे लक्ष्य सध्या करण्यात मदत करेल."


उबर नासाबरोबरच इतर अन्य शक्यतांचा शोधात आहे. यापूर्वी एअर तिकीट बुक करण्यासोबत एअरपोर्ट स्थित किओस्कमधून कॅब बुक करण्याची सुविधा देखील सुरु केली जाईल. यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआई) ने ओला, उबर यांसारख्या कॅबची सुविधा देणाऱ्या उत्तम कंपन्यांसोबत करार केला होता. 


ही सुविधा चेन्नई, कोलकाता, पुणे, लखनऊ आणि भुवनेश्वर यांसारख्या देशातील पाच विमानतळांवर सुरु केली जाईल. गेल्या तीन-चार वर्षात प्रवाशांच्या अपेक्षेत खूप बदल झाले आहेत. प्रवाशांना विमानतळांवर गुणवत्तापूर्ण आणि उत्तम सुविधा अपेक्षित आहेत.