नवी दिल्ली : रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन या टेलिकॉम कंपनीने नवा टेरिफ प्लॅन लॉन्च केलाय. या नव्या प्लॅनची किंमत ३४९ रूपये असून याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळणार आहे. Rcom कडून या प्लॅनला फ्रिडम पॅक असं नाव दिलंय. ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि २८ जीबी डेटा मिळेल. यासोबतच कंपनीने आणखी एक टेरिफ प्लॅन लॉन्च केला असून याची किंमत १९३ रूपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना प्रत्येक दिवशी १ जीबी ३जी डेटा मिळेल. यासोबत कोणत्याही नेटवर्कवर ३० मिनिटांची कॉलिंग ऑफर दिली जाणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांसाठी असेल. 


दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलच्या ग्राहकांना ३४९ रूपयांमध्ये हीच ऑफर दिली जात आहे. यात २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. २८ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच, रिलायन्स जिओ ३०९ रूपयांमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १ जीबी डेट देत आहे.