नवी दिल्ली : सध्या टेलीकॉम कंपन्यांमध्ये डेटा वॉर सुरु आहे. एकानंतर एक कंपनी इंटरनेट डेटा देण्याच्या स्पर्धेत वागली आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वोडाफोनने एंट्री लेवल टेरिफ प्लान आणला आहे. 9 रुपयांचा हा प्लान आहे. वोडाफोनने 9 रुपयांचा हा टेरिफ प्लान एक दिवसाच्या वॅलिडिटीवर लॉन्च केला आहे. अनलिमिटेट वॉईस कॉल आणि एसएमएसचा फायदा देखील या प्लानमध्य़े मिळणार आहे.


वोडाफोनला यूजर्स लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये देखील हा अनलिमिटेड वॉईस कॉल करु शकणार आहेत. याशिवाय यूजर्सला 100 लोकल आणि नॅशनल एसएमएस देखील मिळणार आहे. सध्या हा प्लान यूपीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यानंतर हा देशभरात वेगवेगळ्या भागात लॉन्च केला जाऊ शकतो.