Upcoming Cars In January 2023: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव वर्षाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आतुर आहे. दुसरीकडे कारप्रेमींच्या नजरा पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या गाड्यांकडे लागून आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2023 ची सुरुवात होणार आहे. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही नवीन गाड्या लाँच आणि सादर केल्या जाणार आहे. जानेवारी 2023 मध्ये 7 नवे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये दोन एसयूव्ही (अपडेटेड वर्जन), चार नव्या ईव्ही आणि एक हायब्री एमपीव्हीचा समावेश आहे. त्यासोबत दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही गाड्या सादर केल्या जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा एक्सयूव्ही400, टाटा टियागो ईव्ही, बीवायडी एटीटीओ 3, सिट्रोएन सी3 ईव्ही, एमजी हेक्टर/हेक्टर प्लस फेसलिफ्ट लाँच होणार आहे. यामध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि महिंद्रा एक्सयूव्ही 400 या आधीच सादर केली आहे. मात्र अजूनही किमती जाहीर केल्या नव्हत्या. जानेवारी महिन्यात या गाड्यांची किंमत जाहीर होईल. तसेच विक्रीसाठी उपलब्ध होईल. दुसरीकडे टाटा टियागो ईव्ही आणि बीवायडी एटीटीओ 3 च्या किमती जाहीर झाल्या आहेत. जानेवारीपासून याची विक्री सुरु होईल. कारण बुकिंग याआधीच सुरु झाली आहे. टाटा टियागो ईव्हीची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपये इतकी आहे. तर बीवायडी एटीटीओ 3 ची किंमत 33.99 लाख रुपये आहे. 


बातमी वाचा- iPhone 15 ची जोरदार चर्चा, टिपस्टर्सने जारी केलेली किंमत आणि फीचर्स जाणून घ्या


एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लसचं फेसलिफ्ट वर्जन जानेवारी 2023 मध्ये लाँच होणार आहे. यात कॉस्मेटिक अपडेट आणि फीचर अपग्रेड केले जातील. दोन्ही एसयूव्ही ADAS (अॅडव्हॉन्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम) दिलं जाईल. यात पूर्ण डिजिटल 7 इंच कॉन्फिगरेबल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असू शकतं. या व्यतिरिक्त नवी सिट्रोन सी3 ईव्ही जानेवारी 2023 मध्ये लाँच होऊ शकते. दिल्ली ऑटो एक्सपो आधीच बाजारात सादर केली जाईल. सध्या अधिकृत तारीख सांगण्यात आलेली नाही.