Bajaj-Triumph : रॉयल एनफिल्डला टक्कर देणार बजाजची नवी बाईक, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
गेल्या काही वर्षांपासून रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आपल्या नवीन बाइक्स (bike) भारतीय बाजारपेठेत लाँच करत आहे. 350 सीसी सेगमेंटमध्ये कंपनीचा मोठा हिस्सा आहे. नवीन मॉडेल विकसित करण्यासाठी कंपनीने UK च्या Triumph Motorcycles सोबत हातमिळवणी केली आहे. आता मात्र या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी कंपनी ट्रायम्फसोबत नवीन मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहे. मॉडेलचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र ही मोटरसायकल यावर्षी भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते.
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आपल्या नवीन बाइक्स (bike) भारतीय बाजारपेठेत लाँच करत आहे. 350 सीसी सेगमेंटमध्ये कंपनीचा मोठा हिस्सा आहे. नवीन मॉडेल विकसित करण्यासाठी कंपनीने UK च्या Triumph Motorcycles सोबत हातमिळवणी केली आहे. आता मात्र या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी कंपनी ट्रायम्फसोबत नवीन मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहे. मॉडेलचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र ही मोटरसायकल यावर्षी भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते.
बजाज ट्रायम्फसोबत दोन मॉडेल्सवर काम करत आहे. हे मॉडेल स्क्रॅम्बलर (Model Scrambler) आणि रोडस्टर डिझाइनचे (Roadster design) असू शकतात. या दोन्ही बाइक्सना गोलाकार इंधन टाकीसह गोल हेडलॅम्प मिळण्याची शक्यता आहे. नवीन मोटरसायकल नवीन Pulsar 250 प्रमाणेच ट्यूबलर स्टील फ्रेमवर आधारित असण्याची अपेक्षा आहे. अहवालात असे म्हटले आहे की, नवीन बजाज-ट्रायम्फ मोटरसायकल USD फ्रंट फोर्क्स, मागील मोनोशॉक, 19-इंच फ्रंट आणि 17-इंच मागील अलॉय व्हीलसह येईल अशी माहिती मिळत आहे.
किंमत आणि फीचर्स
रोडस्टर मॉडेलमध्ये सिंगल-सीट डिझाइन, स्क्रॅम्बलर मॉडेलमध्ये स्प्लिट-सीट सेट-अप मिळण्याची शक्यता आहे. नवीन मोटरसायकलमध्ये सिंगल-सिलेंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्पाय मॉडेलमध्ये एक मोठा रेडिएटर आहे. हे सूचित करते की त्यात लिक्विड-कूल्ड 4-व्हॉल्व्ह DOHC इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय, स्क्रॅम्बलर मॉडेलला ट्विन स्टॅक एक्झॉस्ट युनिट मिळण्याची शक्यता आहे. बजाज-ट्रायम्फ मोटरसायकलची किंमत सुमारे 2 लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे.
भारतात लॉन्च केल्यावर, नवीन Bajaj-Triumph मोटरसायकल 300cc सेगमेंटमध्ये Royal Enfield Classic 350, Honda Highness 350, Yezdi आणि KTM 390 Duke यांना टक्कर देईल.