Car Loan Tips: अनेकांचं स्वप्न असतं की आपल्या दारात नवी कोरी गाडी असावी. मात्र पगारात इतकी मोठ्या पैशांची तजवीज करणं कठीण असतं. त्यामुळे कार घेण्यासाठी अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात. पण कर्ज घेतलं की सर्वकाही संपतं असं नाही. तर कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणंही महत्त्वाचं असतं. जर कार लोनचे हफ्ते वेळेवर फेडले नाही तर सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 20-10-4 या फॉर्म्युलाबाबत सांगणार आहोत. यामुळे कर्ज घेताना तुम्हाला मदत तर होईलच शिवाय कर्जाचे हफ्तेही झटपट फेडू शकाल. ज्या लोकांना कार लोन (Car Loan) घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊयात 20-10-4 हे सूत्र नेमकं काय आहे? 


20-10-4 सूत्र काय सांगते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20-10-4 सूत्रानुसार,  कोणतेही वाहन खरेदी करण्यासाठी गाडीची ऑन-रोड किमतीच्या 20 टक्के डाउन पेमेंट करा आणि उर्वरित रकमेसाठी कर्ज घ्या. कर्ज घेताना, लक्षात ठेवा की त्याचा ईएमआय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त नसावा आणि कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त चार वर्षांचा असावा. म्हणजेच, 20-10-4 फॉर्म्युलामध्ये, 20 म्हणजे - 20% डाउन पेमेंट (ऑन-रोड किमतीचे), 10 म्हणजे - मासिक उत्पन्नाच्या 10% ईएमआय आणि 4 म्हणजे - चार वर्षांचा कर्जाचा कालावधी. 


बातमी वाचा- Salary Overdraft: सॅलरी अकाउंटवरही मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा, गरजेच्या वेळी होते मदत


या सूत्रानुसार कार खरेदी केल्यास कर्जाचा फारसा बोजा पडणार नाही. तुम्ही कारचे कर्ज सहजपणे क्लिअर करू शकाल. तथापि, जर तुम्ही डाउन पेमेंट 20 टक्क्यांहून अधिक केलं तर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अधिक सोयीस्कर होईल. म्हणूनच, डाउन पेमेंट (ऑन-रोड किंमतीच्या) 20% पेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कर्जाची रक्कम कमी करता येईल आणि EMI देखील कमी ठेवता येईल.